महाराष्ट्रात महापुराची भीषण परिस्थिती; अंगावर काटे आणणारे फोटो

महाड, सांगली आणि कोल्हापूरमधील भीषण महापुराची परिस्थिती

Jul 23, 2021, 13:30 PM IST

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हाहाःकार माजवला आहे. महाडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच तळई गावात मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये 30 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.  सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक सखल भागात पुराचे पाणी घुसू लागले आहे. चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार दिसून आला आहे. हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. चिपळूणमध्ये जागोजागी एनडीआरएफचं बचावकार्य सुरू आहे.

1/7

2/7

3/7

4/7

5/7

6/7

7/7