अनेकदा नकार देऊनही इंटिमेट सीन्सची ऑफर, अनेक प्रोजेक्ट्स हातून गेले, टीव्ही अभिनेत्रीचा खुलासा

इंटिमेट सीनला अनेकदा नकार देऊनही मेकर्स मला तिच भूमिका देत असल्याचा खुलासा टीव्ही अभिनेत्रीने केला आहे.

Soneshwar Patil | Mar 20, 2025, 05:55 PM IST
1/7

सध्या ओटीटीवर मोठ्या प्रमाणात इंटिमेट सीन्स असतात. यामध्ये काहीच प्रोजेक्ट असे आहेत, ज्यामध्ये बोल्ड किंवा किसिंग सीन्सशिवाय ते पूर्ण होतात. 

2/7

अशातच नुकतीच रिलीज झालेली 'पंचायत' सीरिज याला अपवाद आहे. अशातच आता एका अभिनेत्रीने इंटिमेट सीन्सबाबत मोठा खुलासा केला आहे. 

3/7

इंटिमेट सीन्सला सतत नकार देऊन देखील तिला सतत इंटिमेट सीनसाठी ऑफर येत असल्यामुळे तिच्या हातून अनेक प्रोजेक्ट गेले असल्याचा तिने खुलासा केला आहे. 

4/7

टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनियाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. आता ती 'तेनाली रामा' या मालिकेत दिसत आहे. मात्र, तिने इंटिमेट सीनमुळे अनेक मालिकांना नकार दिला आहे. 

5/7

नुकत्याच टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने मोठा खुलासा केला आहे. अनेक मालिका होत्या. मात्र, त्यामध्ये इंटिमेट सीन्स देखील होते. 

6/7

परंतु, मी इंटिमेट सीन्स करण्यास नकार दिला आहे. तरीही मेकर्स सतत मला याच भूमिका करण्यासाठी ऑफर देत आहेत.   

7/7

सतत येणाऱ्या या सीन्समुळे मला खूप वाईट वाटतं. त्यामुळे माझ्या हातून अनेक वेबसीरिज देखील गेल्या आहेत. असं तिने सांगितले.