Lockdown 3.0 : दुकानं उघडण्यापूर्वीच दारुसाठी लोकांच्या रांगा

May 04, 2020, 12:19 PM IST
1/7

तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन 3.0 सुरु झाल्यानंतर आता राज्य सरकारने सोमवारपासून काही अटी-शर्तींसह दारुची दुकानं सुरु करण्यास परवानगी दिली आहे.  (फोटो सौजन्य : अमित जोशी, डोंबिवली)  

2/7

जवळपास 1 महिन्यानंतर दारुची दुकानं सुरु होत असताना, वाईन शॉप सुरु होण्यापूर्वीच दुकानाबाहेर मद्यप्रेमींच्या रांगा लागल्या आहेत. (फोटो सौजन्य : अमित जोशी, डोंबिवली)

3/7

मद्यविक्री करताना दुकानदार आणि ग्राहकाला सोशल डिस्टंन्सिंगसह काही अटींचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. यावेळी दुकानांबाहेर सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करत मद्यप्रेमी रांगा लावून उभे असल्याचं चित्र आहे. (फोटो सौजन्य : दीपक भातुसे, कांदिवली, मुंबई)

4/7

सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दारुची दुकानं सुरु राहणार आहेत. (फोटो सौजन्य : दीपक भातुसे, कांदिवली, मुंबई)

5/7

वाईन शॉप सुरु होत असल्याने मद्यपींसाठी ही दिलासादायक बाब ठरत आहे. (फोटो सौजन्य : अरुण मेहेत्रे, पुणे)  

6/7

महिनाभरापासून दारुची दुकानं बंद असल्याने अनेक तळीरामांनी, दारुची तहान भागवण्यासाठी हँड सॅनिटायझर प्यायल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. (फोटो सौजन्य : अरुण मेहेत्रे, पुणे)

7/7

ऑरेंज आणि ग्रीन झोनसह रेड झोनमध्येही दारुची दुकानं सुरु होणार आहेत. शहरी भागात कंन्टेमेंट झोन सोडून इतर भागात वाईन शॉप सुरु करता येणार आहेत. (फोटो सौजन्य : कपिल राऊत, ठाणे)