फार्मा कंपन्या-डॉक्टरांच्या पार्ट्या बंद, परवाना होऊ शकतो रद्द

Pharma companies Party: फार्मा कंपन्यांसह आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या इतर कंपन्यांचाही यात समावेश केला जाणार असून आयोगाने यासंदर्भात नियमावली तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. 

| Aug 21, 2023, 17:22 PM IST

Pharma companies Party:आयोगाच्या नियमावली कलम 35 नुसार आता डॉक्टर किंवा त्यांचे कुटुंबीय यांना कंपन्या किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून कन्सल्टन्सी फी किंवा मानधनही घेण्यास सक्त मनाई करण्यात आलीय. 

1/7

फार्मा कंपन्या-डॉक्टरांच्या पार्ट्या बंद, परवाना होऊ शकतो रद्द

Pharma companies doctors parties will be closed NMC lays down new guidelines

Pharma companies Parties:देशातल्या डॉक्टरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. डॉक्टरांना खूश करण्यासाठी फार्मा कंपन्यांकडून मोठमोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. यामध्ये डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे अधिकारी आणि त्यांचे नातेवाईक सहभागी होत असतात. पण अशा पार्ट्यांवर आता चाप बसणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने यासंदर्भातील इशारा दिला आहे. 

2/7

र्कशॉपच्या नावाखाली पार्टी

Pharma companies doctors parties will be closed NMC lays down new guidelines

फार्मा कंपन्यांनी सेमिनार, वर्कशॉपच्या नावाखाली आयोजित केलेल्या पंचतारांकित हॉटेलांमधली डिनर, पार्ट्या यांना हजेरी लावणाऱ्या डॉक्टरांवर एनएमसीची नजर असणार आहे. 

3/7

पार्टी, सोहळ्यांना बंदी

Pharma companies doctors parties will be closed NMC lays down new guidelines

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने आता फार्मास्युटिकल कंपन्यांची थेट किंवा अप्रत्यक्ष स्पाँसरशिप असलेल्या कोणत्याही सेमिनार, वर्कशॉप, पार्टी, सोहळे यांना बंदी घातली आहे. 

4/7

नियमावली तयार

Pharma companies doctors parties will be closed NMC lays down new guidelines

फार्मा कंपन्यांसह आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या इतर कंपन्यांचाही यात समावेश केला जाणार असून आयोगाने यासंदर्भात नियमावली तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. 

5/7

लायसन्स रद्द

Pharma companies doctors parties will be closed NMC lays down new guidelines

नियमांचं उल्लंघन झाल्यास 3 महिने डॉक्टरांचं लायसन्स रद्द करण्याच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. 

6/7

मानधन घेण्यास मनाई

Pharma companies doctors parties will be closed NMC lays down new guidelines

आयोगाच्या नियमावली कलम 35 नुसार आता डॉक्टर किंवा त्यांचे कुटुंबीय यांना कंपन्या किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून कन्सल्टन्सी फी किंवा मानधनही घेण्यास सक्त मनाई करण्यात आलीय. 

7/7

नियमावली आणखी कठोर

Pharma companies doctors parties will be closed NMC lays down new guidelines

आरोग्य क्षेत्रातील कुप्रथा नष्ट करण्यासाठी आयागोना आपली नियमावली आणखी कठोर केल्याचे सांगण्यात येत आहे.