बॉलिवूडमधील 'हे' वडील झाले त्यांच्या मुलांसाठी 'गॉडफादर'

बॉलिवूड. स्टारकिड्स, घराणेशाही आणि बरचं काही

Jul 31, 2020, 17:53 PM IST

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाही आणि गटबाजी या मुद्द्यांवरून चांगलाचं पेट घेतला आहे. बॉलिवूडमध्ये घराणेशाही ही परंपरा फार वर्षांपासून चालत असल्यामुळे नवख्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करता येत नाही, असे अनेक प्रश्न सुशांतच्या आत्महत्येनंतर उपस्थित होत आहेत. दरम्यान बॉलिवूडमध्ये असे काही फादर आहेत जे त्यांच्या मुलांसाठी चक्क गॉडफादर बनले. 

1/6

हरमन बावेजा आणि हॅरी बावेजा

हरमन बावेजा आणि हॅरी बावेजा

हॅरी बावेजाने आपला मुलगा हॅरी बावेजाला बॉलिवूडमध्ये लाँन्च करण्याची पूर्ण तयारी केली. दरम्यान अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत असलेलं हरमनचं नातं चर्चेत येवू लागलं. पण त्यांच्या नात्याला प्रचंड गुपित ठेवण्यात आलं. अखेर ‘लव स्टोरी 2050’ चित्रपटाच्या माध्यमातून हरमन प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र अभिनय क्षेत्रात तो अपयशी ठरला.   

2/6

जॅकी भगनानी आणि वाशु भगनानी

जॅकी भगनानी आणि वाशु भगनानी

जॅकीने कालाविश्वात आपलं वर्चस्व गाजवावं अशी इच्छा त्याचे वडील वाशु भगनानी यांची होती. त्यामुळे ‘कल किसने देखा’ या चित्रपटाच्या माध्यमातून जॅकीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने  'रंगरेज', 'यंगिस्तान', 'वेलकम टू कराची' अशा चित्रपटांमध्ये भूमिका साकारली. त्याच्या अभिनयाचे कौतुक देखील झाले. मात्र प्रेक्षकांनी त्याला अभिनेता म्हणून कधीही स्वीकारले नाही.

3/6

संजय दत्त आणि सुनील दत्त

संजय दत्त आणि सुनील दत्त

१९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रॉकी' चित्रपटापासून ते 'मुन्ना भाई एमबीबीएस' चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका देखील सुनील दत्तने त्यांच्या मुलासाठी पार पाडली. त्यांनी संजय दत्तसाठी सर्वकाही केलं. 

4/6

सनी-बॉबी देओल आणि धर्मेन्द्र

सनी-बॉबी देओल आणि धर्मेन्द्र

सनी-बॉबी देओल आणि धर्मेन्द्र सुपर आयकॉन म्हणून नावारूपास आले नसले तरी. त्यांनी अनेक हिट चित्रपटं बॉलिवूडला मिळवून दिली आहेत. 

5/6

रणधीर, ऋषी आणि राजीव कपूर

रणधीर, ऋषी आणि राजीव कपूर

राज कपूर यांनी आपल्या तीन मुलांना बॉलिवूडमध्ये लाँन्च केले.

6/6

ऋतीक रोशन और राकेश रोशन

ऋतीक रोशन और राकेश रोशन

‘करण अर्जुन’ चित्रपटाला प्रचंड यश मिळाल्यानंतर राकेश रोशन यांनी त्यांचा मुलगा ऋतीक रोशनला बॉलिवूडमध्ये उतरवण्याचा निर्णय घेतला आणि ऋतीकने 'कहो ना प्यार हैं' चित्रपटाच्या मध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटामुळे ऋतीलच्या करियरला चांगलीच कलाटणी मिळाली.