कंगना राणौतचे 'हे' ५ चित्रपट डब्बा बंद

यशाच्या दिशेचे वाटचाल करताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो.

Sep 15, 2020, 15:40 PM IST

यशाच्या दिशेचे वाटचाल करताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. या मार्गाने वाटचाल करत असताना अनेक स्वप्न पूर्ण होता-होता अर्ध्यात थांबून जातात. करियरमध्ये येणाऱ्या अपयशाचा सामना सर्वांनाचं करावा लागतो. अशा परिस्थितीचा सामना अभिनेत्री कंगना राणौतला देखील करावा लागला आहे. कंगनाचे असे अनेक चित्रपटं आहेत जे रूपेरी पडद्यावर येण्याआधीच त्यांचा डब्बा बंद झाला. कंगनाच्या या ड्रीम प्रोजेक्टमधील २ चित्रपटांमध्ये ती बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार होती. 

1/5

'आय लव यू बॉस'

'आय लव यू बॉस'

'आय लव यू बॉस' चित्रपटासाठी तिने हॉट फोटो शूट देखील केलं होतं. या चित्रपटामध्ये बॉसची भूमिका बिग बी साकारणार होते.  

2/5

'पॉवर'

'पॉवर'

'पॉवर' चित्रपटाच्या माध्यमातून देखील कंगना आणि बिग बी एकत्र दिसणार होते. त्यांच्या शिवाय या चित्रपटात संजय दत्त, अनिल कपूर आणि अजय देवगन देखील झळकणार होते.   

3/5

'आय लव एन व्हाय'

'आय लव एन व्हाय'

या चित्रपटात कंगना अभिनेता सनी देओलसोबत झळकणार होती. 'आय लव एन व्हाय'ची  शुटिंगही पूर्ण झाली. पण अखेर हा चित्रपट  डब्बा बंद करण्यात आला.   

4/5

'तेजू'

'तेजू'

या चित्रपटात कंगना एका ८० वर्षीय वृद्ध महिलेची भूमिका साकारणार होती.

5/5

करण जोहरचा चित्रपट 'उंगली'

 करण जोहरचा चित्रपट 'उंगली'