close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पाकिस्तानचा करण जोहर...

बॉलिवूड कलाकारांसारखे दिसणारे किंवा त्यांची मिमिक्री करणारे अनेक आर्टिस्ट आपण पाहतो. परंतु काही अभिनेत्यांचे अगदी त्यांच्यासारखेच सेम टू सेम दिसणारे असे डुप्लीकेट आहेत की खरा कोण हे ओळखणंही कठिण होतं. चित्रपट दिग्दर्शक करण जोहर आज त्याचा ४७वा वाढदिवस साजरा करत आहे. करणसारखाच अगदी सेम दिसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो समोर आला. करण जोहरने गेल्या वर्षी स्वत:च आपल्या या डुप्लीकेटचा शोध लावला होता.

May 25, 2019, 14:07 PM IST
1/5

'लोक मला मी करण जोहरसारखा दिसतो असं म्हणतात. असं आहे का?' असं म्हणत गेल्या वर्षी एका व्यक्तीने स्वत:चा फोटो शेअर केला होता.

2/5

त्यावर करण जोहरने रिट्विट करत 'काही ट्विट्सनंतर माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच राहत नाही...हे यापैकीच एक ट्विट आहे' असं म्हटलं होतं.

3/5

या व्यक्तीने आणखी काही ट्विट करत लोक त्याला त्याच्या लुकबद्दल कशाप्रकारे करण जोहर म्हणतात याबाबतही सांगितलं होतं.

4/5

अगदी करण जोहर सारख्याच दिसणाऱ्या या व्यक्तीचं नाव उस्मान खान आहे.

5/5

या व्यक्तीच्या प्रोफाइलवरुन तो पाकिस्तानचा रहिवासी असल्याचं बोललं जात आहे.