लग्न तर झालं पण...नवरीशिवायच!

गुजरातमधील हिम्मतनगर जिल्ह्यातील एका तरुणाचं लग्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हिम्मतनगर जिल्ह्यातील चांपलानार गावात राहणाऱ्या २७ वर्षीय अजय बरोटची १० मे रोजी वरात निघाली. वरात निघण्याच्या आधी लग्नासंबंधी सर्व विधी करण्यात आले. वरात निघण्याआधी गरबा, हळद, मेहेंदीपर्यंतचे सर्व विधी करण्यात आले. नवरामुलगाही घोड्यावर बसून तयार होता. या लग्नसोहळ्यासाठी ८०० हून अधिक लोक सामिल झाले होते. परंतु या सगळ्यात एक गोष्ट वेगळी होती ती म्हणजे लग्नासाठी नवरीच नव्हती. अजच्या लग्नाचे सर्व विधी करण्यात आले पण नवरीशिवाय.

May 13, 2019, 15:37 PM IST

1/5

काही दिवसांपूर्वी अजयच्या एका नातेवाईकाचं लग्न झालं. ज्यात अजयही सामील झाला होता. त्या नातेवाईकांचं लग्न बघून अजयनेही त्याच्या लग्नाची इच्छा व्यक्त केली. परंतु अजयला लहानपणापासून लर्निंग डिसएबिलिटी आहे. त्यामुळे अजयचं कोणत्याही मुलीशी लग्न होणं कठीणचं.

2/5

मात्र, अजयच्या कुटुंबियांनी मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरीविनाच त्याचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या पत्रिका छापण्यापासून ते एका सामान्य लग्नात जशी तयारी केली जाते त्याचप्रमाणे लग्नाची तयारी केली गेली. कमी होती ती केवळ नवरीची.

3/5

अजयचे वडिल विष्णू बरोट यांनी सांगितलं की, 'माझ्या मुलाला लहानपणापासून लर्निंग डिसएबिलिटी आहे आणि तो अगदी लहान होता तेव्हाच त्याच्या आईचं निधन झालं. तो जेव्हा कधी दुसऱ्यांच्या लग्नात जातो तेव्हा खूप आनंदी होतो. तो नेहमीच त्याच्या लग्नाविषयी विचारत असतो. पण आमच्याकडे त्याच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नसतं. यावर मी माझ्या कुटुंबियांशी चर्चा केली आणि माझ्या मुलाची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. मला अतिशय आनंद आहे की, मी समाजाचा विचार न करता माझ्या मुलाचं स्वप्न पूर्ण केलं' असं त्यांनी म्हटलंय.

4/5

अजयचे काका कमलेश बरोट यांनी 'त्यांचा पुतण्या लहानपणापासून कोणतंही गाणं लावलं की नाचायला लागायचा. गाणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असायचा. आजपर्यंत गावात झालेल्या सगळ्या लग्नांमध्ये तो गेलाय आणि आल्यावर त्याच्या लग्नाबाबत प्रश्न विचारायचा. माझ्या भावाने अजयच्या लग्नाविषयी सांगितलं आणि आम्हालाही ही कल्पना आवडली. त्यानंतर आम्ही सर्वच जण अजयच्या आनंदासाठी अशाप्रकारचं लग्न लावण्यास तयार झालो. कमी होती ती केवळ वधूची' असं त्यांनी म्हटलंय.

5/5

'माझा भाऊ अतिशय नशिबवान आहे. ज्याला त्याच्या कुटुंबाची साथ मिळाली. अजयला आनंदी पाहून आम्ही सर्वजण खुश आहोत. आमचं सर्वांचं अजयवर अतिशय प्रेम आहे. कोणाच्याही भावना दुखवण्यासाठी नाही तर हे लग्न केवळ अजयच्या आनंदासाठी केलं असल्याचं' अजयच्या बहिणीने म्हटलं आहे.