close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

#IndependenceDay2019 : मोदींच्या फेट्याची शान कायम...

रुबाबदार अंदाज आणि साजेशी वेशभूषा यासाठीही चर्चेत असणाऱ्या मोदींनी खऱ्या अर्थाने फेट्याची त्यांची ही परंपरा यंदाच्या वर्षीही कायम ठेवली. 

Aug 15, 2019, 10:13 AM IST

मुंबई : स्वातंत्र्य दिनाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना देशभरात विविध ठिकाणी प्रत्येकजण हा दिवस आपल्या परिने साजरा करत आहे. देशाच्या ७३व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावर पार पडलेल्या ध्वजारोहण समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही अनोखा आणि तितकाच रुबाबदार अंदाज पाहायला मिळाला. दमदार भाषण करत पंतप्रधानांनी देशवासियांना संबोधित केलं. यावेळी पुन्हा एकदा चर्चा झाली ती म्हणजे त्यांच्या बहुरंगी फेट्याची. रुबाबदार अंदाज आणि साजेशी वेशभूषा यासाठीही चर्चेत असणाऱ्या मोदींनी खऱ्या अर्थाने फेट्याची त्यांची ही परंपरा यंदाच्या वर्षीही कायम ठेवली. 

1/6

बहुरंगी फेटा

बहुरंगी फेटा

भारताच्या ७३व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लाल किल्ल्यावर आयोजित ध्वजारोहण सोहळ्यासाठी बहुरंगी फेट्याला पसंती दिली होती.  

2/6

केशरी फेटा

केशरी फेटा

२०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केशरी रंगाचा फेटा बांधला होता. तेव्हा देखील त्यांच्या फेट्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगल्या होत्या.

3/6

लाल आणि पिवळ्या रंगाचा फेटा

लाल आणि पिवळ्या रंगाचा फेटा

प्रत्येक वर्षी फेट्याची शान कायम राखणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१७मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल आणि पिवळ्या रंगाचा चौकटींची डिझाईन असणारा फेटा बांधला होता.  

4/6

गुलाबी रंगाचा राजस्थानी फेटा

गुलाबी रंगाचा राजस्थानी फेटा

हवेतच्या दिशेने मोठ्या झोकाच उडणारा मोदींचा गुलाबी रंगाचा राजस्थानी फेटाही तितकाच खास ठरला होता. २०१६मध्ये त्यांचा हा फेटा पाहायला मिळाला होता. 

5/6

पिवळ्या रंगाचा फेटा

पिवळ्या रंगाचा फेटा

२०१५ मध्ये भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिवळ्या रंगाचा फेटा बांधला होत्या. त्याचप्रमाणे फेट्यावर असलेल्या लाल-हिरव्या रेषा फेट्याची शान आणखी वाढवत होत्या. 

6/6

लाल रंगाचा फेटा

लाल रंगाचा फेटा

भारत देशाच्या पंतप्रधानपदी पहिल्यांदाच विराजमान झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल रंगाचा फेटा बंधून देशातील नागरिकांना संबोधित केले होते.