close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

२५ वर्षांपासून पंतप्रधान मोदींना राखी बांधते 'ही' पाकिस्तानी महिला

Aug 14, 2019, 16:43 PM IST
1/6

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या २५ वर्षांपासून राखी बांधणाऱ्या पाकिस्तानी बहीण कमर जहाँ यावर्षीही मोदींना राखी बांधण्यासाठी दिल्लीत पोहचल्या आहेत. त्या ३० वर्षांपासून गुजरातमधील अहमदाबादमध्ये राहतात.

2/6

त्यांच्या आणि मोदींच्या आठवणी सांगताना त्यांनी, पंतप्रधान मोदी ज्यावेळी संघामध्ये प्रचारक होते, तेव्हापासून मी त्यांना ओळखते. ते कायम इतरांच्या चागंल्याचाच विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

3/6

मोदींबाबत काही आठवणीही त्यांनी सांगितल्या. माझे पती मोहसिन शेख हे पेंटर आहेत. बहीण या नात्याने मी मोदींजींचा नेहमीच सल्ला घेते. पेंटींगचे एग्झिबेशन कुठे लावायचे याबाबतही त्यांच्याशी चर्चा करत असल्याचं त्यांनी म्हटलं. मोदीजींनी माझ्या पतीला चालू घडामोडींवर पेंटिंग बनवण्याचाही सल्ला दिला.

4/6

मोदींना नाती चांगली सांभळता येतात. एक वर्ष मी रक्षाबंधनला त्यांना राखी बांधण्यासाठी जाऊ शकली नव्हती. काही दिवसांनंतर आमची भेट झाली. त्यावेळी त्यांनी मला, राखी बांधायला आली नाही? याबाबत विचारलं होतं. ही गोष्ट माझ्या मनात कायम राहिली असल्याचं त्या म्हणाल्या.

5/6

मोदीजी नेहमी निरोगी, स्वस्थ राहोत आणि लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी असंच काम करत राहावं अशी प्रार्थना करते. मोदींना भेटल्यानंतर एक वेगळाच उत्साह वाटत असल्याचंही त्या म्हणाल्या.

6/6

अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय केवळ जम्मू-काश्मीर लोकांसाठीच नाही, तर संपूर्ण देशाच्या हिताचा निर्णय आहे. या निर्णयामुळे काश्मीरचा अधिक विकास होईल असंही त्यांनी सांगतिलं.