'राजकारण हे माझं काम...'; राजकारणातील एन्ट्रीबद्दल माधुरी दीक्षितचा मोठा खुलासा

Madhuri Dixit Join Politics : बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करणार याबद्दल अनेक वेळा बातम्या समोर आला आहेत. अभिनय सोडून राजकारणात येणार की नाही याबद्दल खुद्द अभिनेत्रीने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे. 

Neha Choudhary | Dec 02, 2025, 09:08 PM IST
twitter
1/10

माधुरी दीक्षित सीरियल किलर मिसेस देशपांडे या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. नागेश कुकूनुर दिग्दर्शित ही सीरिज जिओ हॉटस्टारवर 19 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमुळे ती अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. अशातच राजकारणातील प्रवेशाबद्दल अभिनेत्रीने अखेर मौन सोडलं आहे. 

twitter
2/10

माधुरी दीक्षित राजकारणात येण्याबद्दल 2024 मध्येही चर्चा रंगल्या होत्या. महाराष्ट्रातील उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातून उभ राहण्यासाठी भाजपने माधुरी दीक्षित यांना संपर्क केला होता. 

twitter
3/10

भाजपने माधुरी दीक्षित यांना उमेदवारीसाठी विचारलं असता त्यावेळी अभिनेत्रीने स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर या जागेवरून भाजपकडून ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली होती. 

twitter
4/10

आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. अशातच पुन्हा अभिनेत्रीच्या राजकारणातील वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.   

twitter
5/10

ANI ला दिलेल्या मुलाखतीत माधुरी दीक्षितला राजकारणात प्रवेश करण्याबद्दल विचारण्यात आलं. या प्रश्नावर अभिनेत्रीने पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. 

twitter
6/10

अभिनेत्रीने या मुलाखतीत सांगितलं की, ती सध्या तरी राजकारणात प्रवेश करण्याबद्दल निश्चित काही सांगू शकत नाही.   

twitter
7/10

ते पुढे म्हणाली की, 'पण राजकारण हे काही माझं काम आहे असं मला वाटत नाही. मी स्वत:ला एक कलाकार मानते आणि कलाक्षेत्रात बदल घडवण्यासाठी प्रयत्न करेल.'

twitter
8/10

अभिनेत्री पुढे म्हणाली की, कलाक्षेत्रातील विविध गोष्टींबाबत जागृती करणं किंवा विचारांचं आदानप्रदान करणं यासारख्या भूमिकांमध्ये ती स्वतःला पाहते. 

twitter
9/10

राजकारणात येणं हा तिचा हेतू नाही हे अभिनेत्रीने स्पष्ट केलं आहे. ती तिच्या कलाविश्वातच आनंदी असून अभिनेत्री म्हणाली, एक कलाकार म्हणून मला जे काही परिणाम साधायचे असतात ते मी कलाकार म्हणूनच साधू शकते. राजकारणापेक्षा मला ते जास्त महत्त्वाचं वाटतं.'

twitter
10/10

दरम्यान, माधुरीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर 'तेजाब', 'राम लखन', 'बेटा', 'दिल तो पागल है', 'परिंदा', 'सैलाब' यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आता माधुरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर तिच्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात करत आहे. 

twitter