close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राजकीयमंडळींसह सेलेब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात १० जागांसाठी मतदान होत आहे. 

Apr 18, 2019, 10:29 AM IST

महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात १० जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर हे मतदारसंघ येतात. याशिवाय तामिळनाडूच्या ३९ पैकी ३८ जागांवर मतदान होत आहे. त्याचबरोबर १८ विधानसभा जागांसाठी पोट निवडणूक सुरू आहे. बिहारमध्ये ४० पैकी ५, जम्मू काश्मीरमध्ये ६ पैकी दोन, उत्तर प्रदेशमध्ये ८० पैकी ८, कर्नाटकमध्ये २८ पैकी १४ मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सामान्य जनता त्याचबरोबर राजकीयमंडळी आणि कलाविश्वातील ताराऱ्यांनी मतदान केंद्रावर हजेरी लावली. 

1/7

मणिपूरचे राज्यपाल नजमा हेपत्तूलाने इन्फालच्या मतदान केंद्रातून मतदानाचा हक्क बजावला.

2/7

पुडुचेरीचे राज्यपाल किरण बेदी यांनी सुद्धा मतदान केले.

3/7

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री ई. पलानीसामी यांनी सकाळी मतदान केले.

4/7

बंगळुरू सेंट्रल मधून अपक्ष उमेदवार प्रकाश राज यांनी मतदान केले.  

5/7

मक्कल निधी नियमचे प्रमुख आणि अभिनेता कमल हासन यांनी त्यांची मुलगी श्रृती हसनसोबत चेन्नईच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. 

6/7

संरक्षण मंत्री निर्मला सितारमण यांनी बंगळुरू दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या मतदान केंद्रावर आपले मत नोंदवले.   

7/7

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये गर्भवती महिलेने मतदान केले. सोलापूरच्या नेहरूनगर मतदान केंद्रावर मतदान केले. पतीसोबत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.