पोस्टाच्या 'या' योजनेत १० हजारांच्या गुंतवणुकीवर मिळणार १६ लाखांचा परतावा

Nov 25, 2020, 16:17 PM IST
1/5

पोस्टाच्या 'या' योजनेत १० हजारांच्या गुंतवणुकीवर मिळणार १६ लाखांचा परतावा

गुंतवणुकीच्या दिशेनं हल्ली अनेकांचाच कल दिसून येतो. त्याच धर्तीवर भारतीय पोस्ट बहुविध योजना गुंतवणुकदारांपुढं सादर करत असतं. सातत्यानं अशाच काही योजना सेवेत आणत पोस्टानं आजवर अनेकांना फायदा मिळवून दिला आहे. त्यातच आता एका नव्या योजनेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ज्यामध्ये 10 हजारांती किरकोळ गुंतवणूक केल्यानंतर 16 लाख रुपयांचा परतावा मिळवता येऊ शकतो.  

2/5

पोस्टाच्या 'या' योजनेत १० हजारांच्या गुंतवणुकीवर मिळणार १६ लाखांचा परतावा

रिकरिंड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केल्यास टीडीएस कापला जातो. 40 हजार रुपयांहून जास्त डिपॉझिट असल्यास वर्षाला 10 टक्के दरानं कर आकारला जातो. आरडीवर मिळणाऱ्या व्याजावरही कर आकारला जातो, पण पूर्ण मॅच्योरिटीवर मात्र कर घेतला जात नाही. ज्या गुंतवणुकदारांचा पगार करमुक्त आहे त्यांनी फॉर्म 15 G भरून टीडीएसपासून मुक्ती मिळवण्याचा पर्याय आहे.   

3/5

पोस्टाच्या 'या' योजनेत १० हजारांच्या गुंतवणुकीवर मिळणार १६ लाखांचा परतावा पोस्टाच्या 'या' योजनेत १० हजारांच्या गुंतवणुकीवर मिळणार १६ लाखांचा परतावा

या योजनेअंतर्गत तुम्हाला खात्यात नियमित पैसे ठेवावे लागतात. असं न केल्यास प्रतिमहा 1 टक्के दरानं दंड आकारला जातो.   

4/5

पोस्टाच्या 'या' योजनेत १० हजारांच्या गुंतवणुकीवर मिळणार १६ लाखांचा परतावा

दर महिन्याला तुम्ही पोस्टाच्या या योजनेत 10 हजार रुपयांची गुंतवणूक करत आहात आणि दहा वर्षांसाठी तुम्ही ही गुंतवणूक करत आहात तर, दहा वर्षांनी तुम्हाला 5.8 टक्के व्याजदरानं 16 लाख रुपयांहूनही अधिक परतावा मिळू शकतो.   

5/5

पोस्टाच्या 'या' योजनेत १० हजारांच्या गुंतवणुकीवर मिळणार १६ लाखांचा परतावा

सध्याच्या घडीला पोस्टाकडून रिकरिंग डिपॉझिटवर 5.8 टक्के इतकं व्याजदर मिळत आहे. एप्रिल 2020 पासून हे दर नव्यानं लागू करण्यात आले आहेत. लहान बचत योजनांसाठी व्याज दर तीन महिन्यांनी निर्धारित केले जातात.