PHOTO : अंडरवर्ल्डकडून धमकी, 50 लाखांची मागणी...'या' अभिनेत्रीनं जे केलं त्याचा तुम्ही विचारही करु शकत नाही!

Entertainment :  एकेकाळी तिला अंडरवर्ल्डकडून धमकी आली आणि 50 लाखांची मागणी झाली. त्यानंतर या फोटोमध्ये दिसणाऱ्या चिमुकलीने, जी आता एक लोकप्रिय चेहराही आहे तिनं जे केलं त्याचा तुम्ही विचारही करु शकत नाही.

Jan 31, 2024, 11:12 AM IST
1/8

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी इंडस्ट्रीततील अभिनय विश्वात आपला ठसा उमटवला. ही चिमुकली इंडस्ट्रीतील टॉपची अभिनेत्रींपैकी एक आहे. 

2/8

इंडस्ट्रीतील प्रत्येक बड्या सुपरस्टारसोबत तिने काम केलं असून आज ती बिझनेस वुमन झाली आहे. 

3/8

ओळखलं का या चिमुकलीला... क्यूट, बबली आणि गोल्यावर डिंपल पडणारी ही आहे प्रिती झिंटा...

4/8

प्रितीचे वडील हे आर्मी ऑफिसर होते. त्यामुळे शूरता आणि धैर्य हे तिच्या रक्तात होते. 31 जानेवारीला तिचा 49 वा वाढदिवस आहे. 

5/8

या सिंहिणीला अंडरवर्ल्डकडून धमकी मिळाली होती. 'चोरी चोरी चुपके चुपके' या चित्रपटात अंडरवर्ल्डचा पैसा गुंतवण्यात आल्याचे समोर आल्याने वाद निर्माण झाला होता. 

6/8

हे प्रकरण कोर्टात गेल होतं, तेव्हा शाहरुख खान, सलमान खानपासून महेश मांजरेकरपर्यंत सर्वांनी साक्ष देण्यास नकार दिला. पण प्रिती झिंटा हिने साक्ष दिली होती. 

7/8

तिला अंडरवर्ल्डमधून फोन आला होता आणि 50 लाखांची मागणीही केली होती, अशी साक्ष तिने कोर्टात दिली. या प्रकरणात नाझिम रिझवी आणि भरत शहा दोषी आढळून आले होते. तिच्यातील हे शौर्य पाहून तिला गॉडफ्रे माइंड ऑफ स्टीलचा पुरस्कारही देण्यात आला होता. 

8/8

तिने आता बॉलिवूडला रामराम केलं असून ती टॉप बिझनेस वुमन बनली आहे. तर 2016 मध्ये त्याने परदेशी उद्योगपती जीन गुडइनफसोबत विवाह केला.