#FarmBills शेतकऱ्यांचा देशव्यापी एल्गार

Sep 25, 2020, 10:13 AM IST
1/9

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आज शेतकऱ्यांकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी अखिल भारतीय किसान सभा व संलग्न शेतकरी संघटनांनी भारत बंदची Bharat Bandh हाक दिली आहे. 

2/9

या आंदोलनात ३०हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. 

3/9

याशिवाय, सीटू, हिंद मजदूर सभा, नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आदी १० कामगार संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. या संघटनाही बंदमध्ये सहभागी होतील.  

4/9

कृषी विधेयके राज्यसभेत मंजुरीला आल्यापासून उत्तर भारतात शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. 

5/9

अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्ग रोखून धरले जात आहेत. 

6/9

बिहारमधील दरभंगामध्ये आरजेडी (राष्ट्रीय जनता दल) कामगारांनी म्हशीवर बसून फार्मबिलविरोधात निषेध नोंदविला.

7/9

संसदेत पार पडलेल्या कृषी विधेयकाविरोधात आज शेतकऱ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी निषेधाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-उत्तर प्रदेश सीमारेषेजवळील चिल्ला भागात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 

8/9

कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी कर्नाटक-तमिळनाडू महामार्गावरील बोम्मनहल्लीजवळ संसदेत मंजूर झालेल्या कृषी विधेयकाविरोधात निषेध नोंदवण्यात आला. 

9/9

भारतीय किसान युनियन आणि रेव्होल्यूशनरी मार्क्सवादी पार्टी ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे जालंधरमधील फिलौरजवळ अमृतसर-दिल्ली येथे कृषी विधेयकाच्या निषेधार्थ राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.(सर्व फोटो : ANI)