800 CCTV, 20 मिनिटांत...; महाराष्ट्राला हादरवणाऱ्या हत्या प्रकरणात काय घडलं? पुणे पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

Pune Satish Wagh Murder Case Full Timeline: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या सतीश वाघ हत्या प्रकरणाचा सविस्तर घटनाक्रम समोर आला आहे. या प्रकरणामध्ये आरोपींपर्यंत पोलीस कसे पोहोचले पाहूयात...

| Dec 11, 2024, 15:02 PM IST
1/12

satishwaghmurder

पत्रकारांशी चर्चा करताना पुणे पोलिसांच्या आयुक्तांनी सतीश वाघ हत्या प्रकरणाचा सविस्तर घटनाक्रम सांगितला आहे. तसेच आरोपींपर्यंत कसं पोहचता आलं हे ही त्यांनी सांगितलं आहे. नेमका घटनाक्रम पाहूयात...

2/12

satishwaghmurder

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमीतेश कुमार यांनी मोठा खुलासा केला आहे. सतीश वाघ यांची हत्या 'वैयक्तिक' कारणातून झाली असल्याचे अमीतेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

3/12

satishwaghmurder

वाघ यांच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीनेच हे सगळं कृत्य केल्याचे तपासातून समोर आले असून खून हा खाजगी आणि वैयक्तिक कारणातूनच केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. सतीश वाघ त्यांना ठार मारण्यासाठी 5 लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये समोर आलेल्या गोष्टी आणि नेमका घटनाक्रम काय होता हे पाहूयात...

4/12

satishwaghmurder

सतीश वाघ यांचं अपहरण व खून या दोन्ही घटना अवघ्या तासाच्या आत घडल्याचे पुणे पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे.

5/12

satishwaghmurder

सकाळी साडेसहा वाजता सतीश वाघ यांचे अपहरण झाले आणि ती गाडी मृतदेह टाकून साडेसात वाजता परत आल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट झालं आहे.

6/12

satishwaghmurder

500 ते 800 सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषणनंतर पुणे पोलिसांना आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा मृतदेह शोधून काढला. 

7/12

satishwaghmurder

विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ पहाटे साडेसहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर शेवरलेट एन्जॉय या कारमधून त्यांचे अपहरण झालं.

8/12

satishwaghmurder

सतीश वाघ यांचं अपहरण केल्या नंतर गाडी शिंदवणे घाटाच्या दिशेने नेण्यात आली, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

9/12

satishwaghmurder

ही कार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पोलिसांनी या भागातील जवळपास 500 ते 800 सीसीटीव्ही तपासले.  

10/12

satishwaghmurder

त्यात एक गाडी शिंदवणे घाटाकडे जाताना उरूळी कांचन भागात 7 वाजून 5 मिनिटांनी दिसली.

11/12

satishwaghmurder

तीच गाडी पुन्हा सात वाजून 20 मिनिटांनी परत आल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला.  

12/12

satishwaghmurder

अपहरण केल्यानंतर चालत्या गाडीतच सतीश वाघ यांचा तीक्ष्ण शस्त्राने व लाकडी दांडक्याने मारहाण करून व गळा दाबून खून करण्यात आला. शिंदवणे घाटात मृतदेह टाकून आरोपींनी पळ काढला.