Kapoor Family Tree : 95 वर्षे, बॉलिवूडमधील पहिलं आणि सर्वात मोठं कुटुंब; चौथी पिढीही मनोरंजन क्षेत्रात, कपूर कुटुंबाची संपत्ती किती?

Raj Kapoor 100th Birth Anniversary : कपूर कुटुंबाने राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. इथे अख्खे कपूर कुटुंब एकत्र दिसलं. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास राज कपूर यांनी वेगळ्या उंचीवर नेला आणि आता चौथी पिढीही पुढे नेत आहे. राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त खास कपूर कुटुंबावर कोण कोण आहेत पाहुयात. 

| Dec 14, 2024, 21:14 PM IST
1/22

कपूर कुटुंबाने बॉलीवूडमधील सर्वात मोठे स्क्रीन कुटुंब म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. पृथ्वीराज कपूर यांनी 1929 मध्ये अभिनय सुरू केल्यापासून, कपूर कुटुंबातील 24 सदस्यांनी चित्रपट जगतात आपली कारकीर्द घडवली आहे. कपूर कुटुंब 95 वर्षांपासून चित्रपटसृष्टीशी जोडलं गेलंय. 

2/22

पाकिस्तानमधून मुंबईत आलेले पृथ्वीराज कपूर हे या कुटुंबातील प्रमुख. त्यांच्यानंतर त्यांचा धाकटा भाऊ त्रिलोक कपूरनेही बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.

3/22

पृथ्वीराज कपूर यांना राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर अशी तीन मुले होती.

4/22

त्रिलोक कपूर यांनाही विकी कपूर आणि विजय कपूर ही दोन मुलं होती. विकीने त्याच्या करिअरमध्ये काही चित्रपट दिग्दर्शित करण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नाचा फारसा परिणाम होऊ शकला नाही. तप विजयने चित्रपटांमध्ये प्रवेश केला नाही आणि वकिलीच्या जगात करिअर केलं.

5/22

राज कपूर यांना बॉलिवूडचा 'पहिला शोमन' म्हटलं जायचं. अभिनेता असण्यासोबतच तो एक यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शक देखील होता. राज कपूरचे दोन भाऊ म्हणजे शम्मी कपूर आणि शशी कपूर यांनीही चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

6/22

राज कपूरचे लग्न कृष्णा मल्होत्रा ​​यांच्याशी झालं होतं. त्यांना तीन मुले आणि दोन मुली होत्या. त्यांची मुले रणधीर कपूर, राजीव कपूर आणि ऋषी कपूर यांनी अभिनय क्षेत्रात आपली कारकीर्द घडवली.

7/22

राज कपूर यांच्या मुलींबद्दल बोलायचे झाले तर त्यांची मुलगी रितू नंदा हिचे लग्न राजन नंदासोबत आणि धाकटी मुलगी रीमा कपूर हिचे लग्न मनोज जैन यांच्याशी झाले होते. राज कपूरने आपल्या दोन्ही मुलींना अभिनयापासून दूर ठेवले होते.

8/22

शशी कपूर यांनी 1985 मध्ये जेनिफर केंडलशी लग्न केले. त्यांना दोन मुलगे, कुणाल कपूर, करण कपूर आणि एक मुलगी संजना कपूर. अपयश आल्याने शशी कपूर यांच्या तिन्ही मुलांनी बॉलिवूड सोडलंय. 

9/22

शम्मी कपूरबद्दल बोलायचे झाले तर त्यांचे पहिले लग्न गीता बालीसोबत झाले होते आणि दोघांना दोन मुले आहेत. मुलाचे नाव आदित्य राज कपूर तर मुलीचे नाव कांचन कपूर आहे. शम्मी कपूर यांनी भावनगर राज्यातील राजकुमारी नीला देवी गोहिल यांच्याशी त्यांची पहिली पत्नी गीता बाली यांच्या निधनानंतर विवाह केला.

10/22

आदित्य राज कपूरने स्वतःला अभिनयापुरते मर्यादित ठेवले नाही. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास 9 ते 10 चित्रपट केले आणि त्यानंतर त्यांनी व्यवसाय करण्यास सुरुवात केली.

11/22

कपूर कुटुंबातील इतर मुलींप्रमाणेच शम्मी कपूर यांची मुलगी कांचन हिनेही अभिनयापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. कांचन कपूरचे लग्न मनमोहन देसाई यांचा मुलगा केतन देसाईशी झालंय. 

12/22

रणधीर कपूरने अभिनेत्री बबितासोबत लग्न केले. त्यांच्या दोन्ही मुली करिश्मा कपूर आणि करीना कपूर यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. करिश्मा कपूर ही कपूर कुटुंबातील पहिली महिला सुपरस्टार होती. त्याच्या पावलावर पाऊल टाकत करीना कपूरही बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवत आहे.

13/22

ऋषी कपूर यांनी अभिनेत्री नीतू कपूरसोबत लग्न केले. त्यांचा मुलगा रणबीर कपूर आज बॉलिवूडचा नंबर वन अभिनेता आहे.

14/22

ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूरचे लग्न दिल्लीतील उद्योगपती भरत साहनीसोबत झाले आहे. अनेक वर्षांपासून अभिनयापासून दूर असलेली रिद्धिमा नुकतीच नेटफ्लिक्सवरील एका वेब सीरिजमध्ये दिसली.

15/22

रितू नंदाबद्दल सांगायचं तर त्यांच्या आईप्रमाणेच तिची दोन्ही मुलं नताशा नंदा आणि निखिल नंदा यांनी स्वतःला अभिनयापासून दूर ठेवलं. 

16/22

राज कपूर यांची मुलगी रिमा कपूर, ज्यांना आज रिमा जैन म्हणून ओळखले जाते. हिचा विवाह राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरव होणार होता. रीमा जैन यांची दोन्ही मुले आधार जैन आणि अरमान जैन अभिनयात नशीब आजमावत आहेत. 

17/22

कुणाल कपूरचा मुलगा जान कपूरने नुकतेच हंसल मेहता यांच्या 'फराज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्याची बहीण शायरा कपूर इंडस्ट्रीत सेट डिझायनर म्हणून काम करत आहे.

18/22

करिश्मा कपूर पतीपासून विभक्त झाली आहे. त्यांना दोन मुले आहेत. समायरा कपूर आणि कियान राज कपूर. दोन्ही मुले सध्या शिक्षण पूर्ण करत आहेत.

19/22

करीना कपूरने प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केले. दोघांना दोन मुले आहेत. एकाचे नाव तैमूर आणि दुसऱ्याचे नाव जे.

20/22

निखिल नंदा जरी अभिनयापासून दूर राहिले तरी त्यांचे लग्न चित्रपट कुटुंबात झाले. त्यांनी अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिच्याशी लग्न केले. निखिलचा मुलगा अगस्त्य नंदा याने 2023 साली नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'द आर्चीज' चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. निखिल नंदा यांची मुलगी नव्या नवेली नंदा देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

21/22

रणबीर कपूरने प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टसोबत लग्न केले असून दोन वर्षांपूर्वी त्यांची मुलगी राहाचा जन्म झाला. रणबीरची बहीण रिद्धिमा कपूरची मुलगी समारा साहनी हिलाही तिचे करिअर अभिनयात करायचं आहे. 

22/22

कपूर कुटुंब हे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक आहे. सध्या कपूर कुटुंबातील रणवीर कपूर, करीना कपूर, करिश्मा कपूर, नीतू कपूर आणि आलिया भट्ट चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. जर आपण त्यांच्या संपत्तीबद्दल बोललो तर ती 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.