चमकदार त्वचेसाठी काही घरगुती स्क्रब

Aug 13, 2019, 13:27 PM IST
1/4

तजेलदार त्वचेसाठी सर्वात्तम पर्याय म्हणजे स्क्रब. स्क्रबचा उपयोग त्वचेवरील डेड सेल्स म्हणजेच मृत पेशी दूर करण्याचं, त्वचा मुलायम आणि चमकदार करण्यासाठी केला जातो. चमकदार त्वचेसाठी स्क्रबचा वापर करणं त्वचेला कोणतंही नुकसान पोहचवत नाही. असेच काही स्क्रब घरच्या घरी तयार करुन त्वचा सुंदर, चमकदार राहण्यास मदत होऊ शकते. 

2/4

दोन पिकलेली केळी घ्या. ती चांगली बारिक करुन त्यात साखर टाका. साखर-केळ्याचं मिश्रण चांगलं एकत्र करुन त्यात एक चमचा मध मिसळा. हे तयार झालेलं स्क्रब हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ साफ करा.

3/4

कॉफी स्क्रबही त्वचेसाठी फायदेशीर आहे. कॉफी, मध आणि बदाम तेलाच्या मदतीने हे स्क्रब तयार होतं. एक चमचा कॉफी पावडर, एक चमचा मध आणि अर्धा चमचा बदाम तेल यांची एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून १० मिनिटांपर्यंत हलक्या हातांनी मसाज करा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

4/4

मसूर डाळ स्क्रब म्हणून चेहऱ्यासाठी उत्तम काम करते. मसूर डाळ थोडी जाडसर करा. त्यात दूध मिसळून काही वेळ हे मिश्रण असंच राहू द्या. हे मिश्रण चांगलं भिजल्यानंतर ते चेहऱ्यावर लावा. ५ मिनिटांपर्यंत मसाज करा. आठवड्यातून एक-दोन दिवस हे स्क्रब लावू शकता.