परिस्थिती नुसार बदललेल्या रानू मंडल...
कलेवर आपले नितांत प्रेम असेल तर तिच कला आपल्याला जगायला शिकवते.
मुंबई : कलेवर आपले नितांत प्रेम असेल तर तिच कला आपल्याला जगायला शिकवते. त्यामुळे आपला आत्मविश्वास सहाजिकच वाढतो. गेल्या काही दिवसांपासून रानू मंडलच्या चर्चा वाऱ्यासारखा पसरत आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यात असलेल्या दैवी देणगीची प्रशंसा मोठ्या प्रमाणात होत आहे. इन्टरनेट सेंसेशन ठरलेल्या रानू मंडलने सर्वांच्या मनात घर केले आहे. आयुष्यातील १० वर्ष कठीण प्रसंगांना तोंड दिल्यानंतर अखेर त्यांच्या जीवनात सोन्याचा दिवस आला आहे.