close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बाजारात लवकरच येतेय 'Renault'ची स्वस्तातील ७ सीटर कार

Aug 16, 2019, 19:47 PM IST
1/7

भारतीय बाजारात रेनो (Renault) लवकरच ७ सीटर कार 'ट्रायबर' (Triber) लॉन्च करणार आहे. देशभरात १७ ऑगस्टपासून यासाठी बुकिंग करता येणार आहे. कंपनीच्या वेबसाईटवरुन ११ हजार रुपयांच्या टोकनद्वारे कारचं बुकिंग करता येणार आहे.  

2/7

रेनोने Renault Triber ही ७ सीटर कार १९ जून रोजी भारतात आणली. रेनो 'ट्रायबर'चं चेन्नईतील एका प्लांटमध्ये उत्पादन केलं जात आहे. २८ ऑगस्टला कारचं लॉन्चिंग होणार आहे.

3/7

भारतीय बाजारात ७ सीटर कारची वाढती मागणी पाहता कंपनीने 'ट्रायबर' तयार केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाजारातील इतर ७ सीटर कारच्या तुलनेत 'ट्रायबर'ची किंमत कमी असणार आहे.   

4/7

मिडिया रिपोर्ट्सनुसार, Renault Triberची किंमत जवळपास ५.५ लाख ते ७.५ लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

5/7

लोकांना अधिक जागा मिळावी अशाप्रकारे 'ट्रायबर'चं डिझाइन करण्यात आलं आहे. ट्रायबरच्या सीट १०० हून अधिक प्रकारे अडजस्ट करता येऊ शकतील अशी रचना असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

6/7

रेनो ट्रायबरमध्ये ड्युयल-टोन कलर स्किम, इंस्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये ३.५ इंच एलईडी स्क्रिन आणि ७.९ इंच टचस्क्रिन इंफोटेनमेंट स्टिस्टम आहे. इंफोटेनमेंट स्टिस्टममध्ये अॅपल कार प्ले आणि अॅन्ड्रॉइड ऑटोचा सपोर्ट देण्यात आला आहे. 

7/7

सुरक्षेच्यादृष्टीने रेनो ट्रायबरमध्ये ड्युयल फ्रंट एयरबॅग, एबीएस, रियर पार्किंग सेंसर आणि स्पीड वॉर्निंग सिस्टम देण्यात आला आहे. याच्या आणखी चांगल्या वेरिएंटमध्ये रिवर्स पार्किंग कॅमेरा आणि अधिक एयरबॅगही मिळणार आहेत.