12 वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती, तरी आजही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर, किती आहे सचिन तेंडुलकरची संपत्ती?

Sachin Tendulkar Networth : भारतरत्न पुरस्कार प्राप्त दिग्गज माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आज त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. सचिन भारताकडून जवळपास 24 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलाय, यादरम्यान त्याने अनेक रेकॉर्डस् सुद्धा नावावर केले. मात्र 12 वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सुद्धा आजही सचिन हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर आहे. तेव्हा सचिनची नेमकी संपत्ती किती आणि त्याचे उत्पन्नाचे स्रोत काय आहेत याविषयी जाणून घेऊयात.   

Pooja Pawar | Apr 24, 2025, 02:47 PM IST
twitter
1/7

सचिन तेंडुलकरने 24 एप्रिल 1973 रोजी एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबामध्ये जन्म घेतला. 16 व्या वर्षी त्याने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने दमदार फलंदाजी करून जगातील क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्डस् आपल्या नावे केले. 

twitter
2/7

सचिन तेंडुलकरने 16 नोव्हेंबर 2013 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र आजही त्याची फॅन फॉलोविंग आणि ब्रँड व्हॅल्यू कमी झालेली नाही. त्यामुळे तो आजही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर्स पैकी एक आहे.   

twitter
3/7

सचिन तेंडुलकर याची एकूण संपत्ती ही 175 मिलियन म्हणजेच 1436 कोटी रुपये आहे. सचिनच्या मुंबईतील बांद्रा येथे असणाऱ्या आलिशान बंगल्याची किंमत ही जवळपास १०० कोटी आहे. याशिवाय सचिनच्या नावावर मुंबईतील विविध भागांमध्ये आलिशान अपार्टमेंट सुद्धा आहेत. 

twitter
4/7

सचिन तेंडुलकरचा ट्रू ब्लू नावाचा कपड्यांचा ब्रँड आहे. मुंबईत सचिनच्या नावावर एक रेस्टॉरंट देखील असून 2021 मध्ये सचिनने जेटसिंथेसिस मध्ये गुंतवणूक केली होती ज्या माध्यमातून त्याने 100 एमबी गेमिंग प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केली आहे. टेन एक्स यू नावाचा स्पोर्ट्स ब्रँड सुद्धा सचिनचा आहे. 

twitter
5/7

सचिन तेंडुलकर हा अनेक मोठ्या कंपन्यांचा ब्रँड अँबॅसिडर आहे. यात अपोलो टायर, कोलगेट, अनअकॅडमी, बँक ऑफ बडोदा, चितळे इत्यादी नावाजलेल्या कंपन्यांचा समावेश आहे.   

twitter
6/7

टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार 2024 च्या अंती सचिन तेंडुलकरकडे 170 मिलियन यूएस डॉलर्स इतकी संपत्ती होती. तर सर्वात श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर एम एस धोनी असून त्याची संपत्ती ही 111 मिलियन यूएस डॉलर्स आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या विराट कोहलीची संपत्ती 92 मिलियन इतकी आहे. 

twitter
7/7

सचिन तेंडुलकरच्या बंगल्यातील बेसमेंटमध्ये कार पार्किंग आणि गॅरेज असून त्याच्याकडे मारुती सुझुकी 800, BMW X5M, BMW 7-Series 750L, BMW M6 ग्रॅन कूप, BMW M5 30 Jahre, BMW i8, Nissan GT-R Egoist, Ferrari 360 Modena, Fiat car, Mercedes-Benz C36 AMG इत्यादी आलिशान गाड्यांचा समावेश आहे. सचिनचं हे कार कलेक्शन कोट्यवधींच्या घरात आहे.   

twitter