close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

वृक्षारोपणासाठी ड्रोनमधून टाकलं जातंय बियाणं

उत्तराखंडमध्ये सध्या हरेला उत्सव साजरा केला जात आहे. हा उत्सव साजरा करण्याचा हेतू वृक्षारोपण करणं हा आहे. या कार्यक्रमात वनविभागासहित इतर विभाग आणि स्वयंसेवी संस्थांद्वारा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचं काम करण्यात येत आहे. मोकळ्या भूखंडावर झाडे उगवावीत यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. पण टिहरी जिल्ह्यात एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे.

Aug 13, 2019, 16:23 PM IST
1/5

या उपक्रमांतर्गत ड्रोनद्वारा बिया खाली मोकळ्या जमिनीवर फेकल्या गेल्या. पहिल्यांदाच ड्रोनच्या मदतीने, जंगल क्षेत्रात झाडं लावण्याच्या उद्देशाने बियाणं पेरण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलं. उत्तराखंडमध्ये पहिल्यांदाच ड्रोनमध्ये उपकरण (डिवाइस) लावून बियाणांची पेरणी करण्यात येत आहे.

2/5

हे तंत्रज्ञान अशा जागांसाठी उपयोगी आहे जिथे, माणूस सहजासहजी पोहचू शकत नाही. टिहरी वन विभाग आणि संकल्प तरु फाउंडेशनचा हा उपक्रम आगामी काळात अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

3/5

सीडीओ आशिष भटगई आणि डीएफओ कोको रोसे यांनी या ड्रोन उपकरणाची (डिवाइस) चाचणी केली. आशिष भटगई यांनी ड्रोनसाठी नागरिक उड्डाण विभागाची परवानगी घेण्यात आल्याचं सांगितलं. ज्या ठिकाणी वनविभागाला या तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे तेथे प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागेल. माणूस सहज पोहचू शकणार नाही अशा दूरच्या ठिकाणी ड्रोनच्या मदतीने बीजारोपण केलं जाईल.

4/5

संकल्प तरूचे इनोव्हेशन तज्ञ उमेश चौधरी यांनी, ड्रोनची वेटलिफ्टिंग क्षमता ७०० ग्रॅम असल्याचं सांगितलं. ३०० मीटर उंचीवरुन बिया टाकल्या जाऊ शकतात. 

5/5

डीएफओ कोको रोसे यांनी ड्रोनमधून वड आणि पिंपळाच्या बिया जमीनीवर फेकल्या जात आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास वन विभाग वृक्ष नसलेल्या जमिनीवर तसंच इतर भागातही या तंत्राचा वापर करणार आहे. त्यांनी हा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच होत असल्याचं म्हटलंय.