'जब तक रहुंगा, भाई के साथ रहुंगा', सलमान-शेराच्या नात्याला २५ वर्षे!

अनेक सेलिब्रिटींना त्याचे खासगी बॉडीगार्ड्स असतात. पण सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची नेहमीच चर्चा असते. १९९४ पासून सलमानसोबत असलेला शेरा आता सलमानच्या कुटुंबाचा एक सदस्यच झाला असल्याचं म्हणायला हरकत नाही.   

Nov 18, 2019, 13:13 PM IST
1/8

सलमानच्या शेराचा एक डायलॉगही फेमस आहे, 'जब तक जिंदा रहुंगा, भाई के साथ रहुंगा'...सलमानचा बॉडीगार्ड बनून शेराला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. सलमानने स्वत: शेरासोबतचा एक फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. 

2/8

१९९४ मध्ये सलमानचा भाऊ सोहेल खानने शेराचा इंटरव्ह्यू घेतला होता. त्यानंतर त्याला सलमानच्या बॉडीगार्डची नोकरी देण्यात आली.

3/8

त्यावेळी सोहेल खानने शेराला, सलमानसोबतच राहावं लागेल असं सांगितलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत सलमान आणि शेरा एकत्र आहेत.

4/8

शेराचं घर मुंबईत सलमान खानच्या 'गॅलेक्सी'च्या अगदी बाजूलाच आहे.

5/8

शेराची एक सिक्युरिटी कंपनीही आहे. त्या कंपनीचं नाव 'टायगर सिक्युरिटी' आहे. 'टायगर सिक्युरिटी' सेलिब्रिटींना सुरक्षा पुरवण्याचं काम करते.

6/8

शेरा सलमानसोबत 'बॉडीगार्ड' चित्रपटातही झळकला होता.

7/8

२०१६ मध्ये शेराला एका मारहाणीच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलं होतं.

8/8

सलमान शेराला बॉडीगार्ड नाही तर भाऊ मानत असल्याचं, शेराने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. शेराचे सोशल मीडियावरील अनेक फोटो त्याचं सलमानसोबत असणारं नातं समजण्यास पुरेसं असल्याचं म्हणायला हरकत नाही.