'बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकत्र ...', राज ठाकरे भेटीनंतर एकनाथ शिंदेच्या विश्वासू नेत्याची सूचक पोस्ट; 'हिंदुत्वाच्या विचारासाठी....'

Naresh Mhaske on Raj-Eknath Shinde Meet: राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानं वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलं आहे. राज ठाकरेंच्या भेटीमागचं कारण काय? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. यादरम्यान एकनाथ शिंदेंच्या विश्वासू नेत्याने एक सूचक विधान केलं आहे.   

Shivraj Yadav | Feb 19, 2026, 01:33 PM IST
twitter
1/8

Naresh Mhaske on Raj-Eknath Shinde Meet: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.   

twitter
2/8

राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानं वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटलं आहे. राज ठाकरेंच्या भेटीमागचं कारण काय? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी शिंदेंची भेट घेतल्यानं नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.  

twitter
3/8

या भेटीनंतर मनसेने पोस्ट करत माहिती दिली आहे की, ही सदिच्छा भेट होती आणि यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आल्या.   

twitter
4/8

"आज राज साहेबांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. त्या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाल्या, तसंच मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवास्थानातील हेरिटेज वास्तूंच्या फोटोजबद्दल, त्यासंबंधींच्या राजसाहेबांच्या आठवणी आणि नंदनवन या निवास्थानाशी संबंधित काही हेरिटेज आठवणींबद्दल चर्चा झाल्या," असं मनसेने पोस्टमध्ये लिहिलं आहे.   

twitter
5/8

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यावर व्यक्त झाले आहेत. "कोणी कोणाला भेटणं यावर बंधन नाही. पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरोधात आमचं टोकाचं भांडण आहे. हे टोकाचं भांडण एकनाथ शिंदे यांनी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, विचारांशी बेईमानी केली म्हणून आहे. अमित शाह, नरेंद्र मोदी यांचा स्वार्थ त्यामागे होता आणि आहे," असं संजय राऊत म्हणाले आहेत.  

twitter
6/8

पुढे ते म्हणाले की, "कोणी कोणाला भेटावं हा त्यांचा प्रश्न आहे. आमचं भांडण कायम राहणार. महाराष्ट्राच्या हितासाठी हे भांडण आम्ही उकरुन काढलं आहे. कोणीही यावं आणि बाळासाहेबांच्या विचारांवर थुकावं हे आम्हाला चालणार नाही. काय होतं ते पाहू. हे प्रश्न त्यांच्या (मनसेच्या) लोकांना विचारा. का भेटले हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे".   

twitter
7/8

यानंतर एकनाथ शिंदेंचे विश्वासू नरेश म्हस्के यांनी पोस्ट शेअर केली आहे. बाळासाहेबांच्या मुशीतून घडलेले दोन कार्यकर्ते हिंदुत्वाच्या विचारासाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी  एकत्र येणार असतील तर माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना आनंदच होईल असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.   

twitter
8/8

काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांची भेट झाली. अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि अनेकांना पोटशूळही उठला. परंतु, बाळासाहेबांच्या मुशीतून घडलेले दोन कार्यकर्ते हिंदुत्वाच्या विचारासाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी  एकत्र येणार असतील तर माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना आनंदच होईल!! असं नरेश म्हस्के यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.   

twitter