श्रिया पिळगावकर पुन्हा एकदा चर्चेत

मुंबई : अभिनेते सचिन पिळगावकर - सुप्रिया पिळगावकर यांची कन्या श्रिया पिळगावकर लवकरच 'बाहुबली'फेम राणा दग्गुबातीसोबत दिसणार आहे. 

Dec 08, 2019, 14:18 PM IST

श्रियानं नुकतंच 'हाथी मेरे साथी' या तीन भाषांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सिनेमाचं शूटींग पूर्ण केलंय. 'हाथी मेरे साथी' या सिनेमाद्वारे श्रियाची तामिळ आणि तेलुगु सिनेमांमध्ये एन्ट्री होणार आहे. 

1/5

साऊथ सिनेमात डेब्यू

साऊथ सिनेमात डेब्यू

राणा दग्गुबातीसोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता, असं श्रियानं म्हटलंय.   

2/5

श्रियासोबत दिसणार राणा दग्गुबाती

श्रियासोबत दिसणार राणा दग्गुबाती

प्राण्यांवर आधारीत असलेल्या या सिनेमात पुलकित सम्राट, विष्णू विशाल, जोया हुसैन आणि कल्की केकला यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 

3/5

हिंदीसोबतच तामिळ आणि तेलुगु भाषांत

हिंदीसोबतच तामिळ आणि तेलुगु भाषांत

'इरॉस इंटरनॅशनल'च्या या सिनेमाचं तामिळ शीर्षक 'कादन' आणि तेलुगुमध्ये 'अरन्या' आहे. 

4/5

प्रभू सोलोमन यांचं दिग्दर्शन

प्रभू सोलोमन यांचं दिग्दर्शन

प्रभू सोलोमन यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलाय. या सिनेमाचं शूटींगही हिंदी, तामिळ आणि तेलुगु अशा तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये करण्यात आलं. 

5/5

राजेश खन्ना - तनुजा यांच्या 'हाथी मेरे साथी'चा रिमेक

राजेश खन्ना - तनुजा यांच्या 'हाथी मेरे साथी'चा रिमेक

मानव आणि प्राण्यांमध्ये असलेल्या भावनात्मक संबंधांवर आधारित खऱ्याखुऱ्या घटनेवर हा सिनेमाची कथा बेतललेली आहे. १९७१ मध्ये आलेल्या राजेश खन्ना आणि तनुजा यांच्या 'हाथी मेरे साथी' या सिनेमाला नवीन सिनेमा आदरांजली व्यक्त करणारा असेल