close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बिग बींची लाडकी मुलगी श्वेता नंदाच्या लग्नाचे फोटो पहिल्यांदाच व्हायरल

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी सध्या चांगलीच चर्चेत आहे. 

Aug 13, 2019, 14:01 PM IST

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी सध्या चांगलीच चर्चेत आहे. कारण तिच्या लग्नाचे फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत. बिग बींच्या लाडक्या मुलीचे फोटो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या करियरला ३३ वर्षे पूर्ण झली आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून श्वेता नंदाच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. व्हायरल होत असलेल्या या फोटोंना नेटकऱ्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. फोटोंमध्ये श्वेता वधूच्या रूपात फार आकर्षक दिसत आहे. 

1/6

श्वेता नंदा अभिनेता अमिताभ बच्चन आणि पत्नी जया बच्चन यांची मुलगी आहे.   

2/6

श्वेताला दोन मुलं आहेत. एक मुलगी नव्या नवेली आणि मुलगा अगस्त्य नंदा. 

3/6

भाऊ अभिषेक सोबतचा हा फोटो फार सुंदर आहे. 

4/6

श्वेता नंदाचे पती निखील नंदा प्रसिद्ध उद्योगपती आहेत. 

5/6

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन फोटोमध्ये आकर्षक दिसत आहेत. 

6/6

फोटो शेअर करत अबू जानी आणि संदीप खोसला म्हणाले की, 'श्वेता बच्चन आणि निखील नंदा यांच्या धमाकेदार लग्नामध्ये फार धम्माल आली. जया आमच्या बहिणी सारखी आहे. त्याचप्रमाणे श्वेता आणि अभिषेकला आम्ही त्यांच्या बालपणापासून ओळखत आहोत. म्हणून हे लग्न आमच्यासाठी फार महत्वाचे होते.'