close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

टोकियोमध्ये सोनमचे 'आनंद'दायी क्षण

 आनंद- सोनम जापानच्या टोकियो शहरात काही निवांत क्षण व्यतीत करत आहेत. 

Jun 25, 2019, 16:04 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. गत वर्षी ८ मे रोजी तिने आपला जवळचा मित्र उद्योगपती आनंद आहूजासह विवाह बंधनात अडकली. परंतु त्यांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे ही जोडी त्यांच्या या नात्याला फार वेळ देऊ शकलेली नव्हती. पण, तरीही आता वेळ काढत आनंद- सोनम जापानच्या टोकियो शहरात काही निवांत क्षण व्यतीत करत आहेत. सोनमने त्यांच्या सुट्यांचे फोटो स्वत:च्या इन्स्टाग्राम अकउंटवरून शेअर केले आहेत. त्यातील काही निवडक फोटो...

 

1/5

सोनम कपूर तिच्या आगामी 'द झोया फॅक्टर' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. २० डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

2/5

'द जोया फॅक्टर' ही कथा लेखिका अनुजा चौहान यांच्या फिक्शनवर आधारित आहे. ही एका राजपूत मुलीची गोष्ट आहे. जिचं नाव झोया आहे.

3/5

चित्रपटात सोनम कपूर, झोया सिंह सोलंकी ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता दुल्कर सलमानही प्रमुख भूमिकेत असणार आहे. अभिषेक शर्मा 'द झोया फॅक्टर'चे दिग्दर्शन करणार आहेत. 

4/5

सोनमने सोशल मीडियावर झोया सिंह सोलंकी नाव बदलून सर्वांनाच आश्चर्यचकीत केले होते. लग्नानंतर सोशल मीडियावर नाव बदल्यामुळे तिच्या नावाची चर्चा चांगली रंगली होती. 

5/5

हिंदू मुलगी असलेल्या मुस्लिम मुलीची ही कथा फार विनोदी, भावूक आणि रोमान्सने परिपूर्ण असणार आहे. (फोटो सौजन्य-सोनम कपूर)