मसाल्याचे पदार्थ आरोग्याला गुणकारी

उन्हाळ्यामध्ये घरगुती मसाले तयार केले जातात. मसाले आपल्या दैनंदिन जीवनात मसाला  फार महत्वाचा पदार्थ आहे.

Apr 18, 2019, 11:37 AM IST

उन्हाळ्यामध्ये घरगुती मसाले तयार केले जातात. मसाले आपल्या दैनंदिन जीवनात मसाला  फार महत्वाचा पदार्थ आहे. मसाल्यामुळे पदार्थांना लज्जदार चव येते. जिभेचे चोचले पुरवणाऱ्या या मिरचीचे अनेक प्रकार आहे. काश्मीरी, संकेश्वरी, लवंगी इत्यादी. मिरच्यांमध्ये अनेक गुणकारी गुणधर्म आहेत. मिरचीच्या फाळांमध्ये अ, ब, क, आणि ई जवनसत्त्वे असतात. त्यांचप्रमाणे मिरच्यांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस यांसारखी खनिजे असतात. मिरची उत्पादनाच्या यादीत भारत देशाचा अव्वल नंबर लागतो.

मसाल्याच्या पदार्थांमध्ये अनेक पदार्थांचा समावेश होतो. जिरे, काळी मिरी, हळद, धने, वेलची इत्यादी पदार्थ आहेत. जाणून घ्या मसाल्याच्या पदार्थांचा उपयोग

1/6

जिरे

दह्यात भाजलेल्या जिऱ्याचे चुर्ण घालून खाल्यास डायरियावर आराम मिळतो. जिऱ्यात लिंबाचा रस आणि मीठ घाला. त्यामुळे उलटीसारखे वाटणे, मळमळणे यावर आराम मिळेल. जिऱ्यात थोडे व्हिनेगर घालून खाल्यास उचकी बंद होते. जिऱ्यात गुळ घालून त्याच्या गोळ्या बनवा. त्या मलेरियावर लाभदायी ठरतात. एक चिमुटभर कच्चे जिरे खाल्याने अॅसिडीटीपासून सुटका होते. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी एक छोटा चमचा जिरे दिवसातून दोनदा पाण्यासोबत घ्या. नक्कीच फायदा होईल. 

2/6

वेलची

वेलचीच्या नियमित सेवनाने चांगली भूक लागते. वेलची चावून खाल्ली तर अॅसिडीटी दूर होते, त्याचप्रमाणे होणारी जळजळ थांबते. खोकला, सर्दी, छातीत होणारा कफ दुर करण्यास वेलची लाभदायक आहे. गरम पाण्यात वेलच्या तेलाचे काही थेंब टाकून ते नाकात टाकल्यास आराम मिळतो. 

3/6

धने

धन्याच्या पाण्यामध्ये एस्कॉर्बिक अॅसिड शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. संसर्ग आणि सर्दी-खोकल्याचा धोका कमी असतो. नियमित धन्याचे पाण्याचे सेवन केल्यास दुर्गंधीची समस्या दूर होते त्याचप्रमाणे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये त्रास कमी होतो.  मधुमेहाचाही धोका टळतो. 

4/6

हळद

रोज हळदीचे दुध प्यायल्याने शरीराला पुरेसे कॅल्शिअम मिळते. हाडे निरोगी आणि मजबूत राहतात. हळदीचे दुध संधीवातासाठी फार उपयुक्त असते. यामुळे वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते. हळदीच्या दुधामुळे रक्त संचार वाढतो. रोज हळदीचे दुध पिण्यामुळे चेहरा चमकायला लागतो. 

5/6

बडीशेप

शरीर शुद्धीबरोबरच बडीशेपमुळे रक्त शुद्धीकरणाचेही काम होते. बडीशेपमुळे पचन क्रिया सुधारते त्याचबरोबर चेहऱ्यावर तेजी येते. ररोज बडीशेप खाल्ल्यास त्याचा आरोग्याला अतिशय चांगला फायदा होतो. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स दूर होण्यास मदत होते. 

6/6

तमालपत्र

तमालपत्र पचनक्रियेसाठी अत्यंत गुणकरी आहे. तमालपत्राने मुतखडा आणि किडनीसंबंधीत ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होतात. तमालपत्र पाण्यात टाकून पाणी उकळावे. उकळलेले पाणी थंड करुन पिणे. किडनी स्टोन, किडनीबाबतच्या समस्यांवर मात करता येते.