Double Alphabets: तुमच्या नावात दोनदा 'हे' अक्षर आहे का? तर नसेल पैशांची चिंता

जन्माच्या वेळी मुलांची नावं त्यांचा ज्या मुहूर्तावर जन्म झाला यावरून ठेवण्यात येतं किंवा मग काही लोकांच्या नावावरून ठेवली जातात. काही लोक लहान नावे ठेवण्यास प्राधान्य देतात तर काही लोक मोठी नावे पसंत करतात. कधीकधी असे होते की लोकांच्या नावामध्ये इंग्रजी अक्षरं दोनदा येतात आणि ती अक्षरे आपल्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा करतात. आपल्या नावावरून आपल्या चारित्र्याबद्दल देखील भविष्य वर्तवण्यात येते. अशाच काही अक्षरांविषयी आज आपण जाणून घेऊया...

Feb 01, 2023, 18:28 PM IST
1/4

special secret about repeated alphabets in your name know in detail

A  आणि I  जर तुमच्या नावात A किंवा I हे अक्षर दोनदा असतील तर याचा अर्थ तुम्ही खूप आनंदी आणि उत्साही व्यक्ती आहात. यासोबतच तुमच्यात खूप धैर्य आहे. कोणतंही काम करताना तुम्ही घाबरत नाही. भविष्याचा विचार करत तुम्ही अनेक गोष्टी करतात. कधी आणि कुठे काय करावे हे तुम्हाला माहित असतं. तुमचे नशिब खूप चांगले असते.   

2/4

special secret about repeated alphabets in your name know in detail

S आणि  L तुमच्या नावात S किंवा L हे अक्षर दोनदा असतील, तर तुमच्या कल्पनेला मर्यादा नसते. बहुतेकदा या अक्षराचे लोक कलाकार असतात. अशा व्यक्तींना संगीत आणि कला क्षेत्रात विशेष आवड असते. हे लोक लगेच भावूक होतात. तुमची पर्सनॅलिटी लोकांच्या पसंतीस उतरते.   

3/4

special secret about repeated alphabets in your name know in detail

M, N आणि T ज्या लोकांच्या नावात M, N आणि T अक्षरे आहेत, त्या लोकांना पैसे कमवण्याचे अनेक मार्ग माहित असतात. असे लोक बुद्धिमान असतात. शिवाय ते कधीही कोणत्याही गोष्टींपासून लांब पळत नाहीत. त्यांना पैशांची चिंता नसते.   

4/4

special secret about repeated alphabets in your name know in detail

O  आणि P   ज्यांचा नावात O आणि P ही अक्षरे दोनदा येतात. ते लोक शांत स्वभावाचे असतात. हे लोक मोजकंच बोलतात. त्यांच्यावर कोणीही रागावू नये, अशी त्यांची इच्छा असते. त्याच्या या गुणामुळे तो समाजात एक लोकप्रिय ठरतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)