close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'तारक मेहता...'तील बबितासोबत असं काही झालं...

Jul 11, 2019, 18:43 PM IST
1/6

'तारक मेहता का उल्टा चष्मा' अभिनेत्री मुनमुन दत्ता प्रेक्षकांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. 'तारक मेहता...'च्या 'बबिता' या भूमिकेतून मुनमुन घरांघरांत पोहचली आहे. नुकतंच, मुनमुन तंजानियामध्ये किलिमंजारो पर्वतांवर ट्रेकिंगसाठी गेली होती. परंतु तिथे तिच्यासोबत असं काही घडलं की, तिला रातोरात ट्रिप सोडून पुन्हा परतावं लागलं.

2/6

मुनमुन दत्ताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या ट्रिपबद्दल माहिती दिली. 'ज्यावेळी मी पर्वत चढण्यास सुरुवात केली त्यावेळी, मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या माझ्या ग्रुपमधील सर्वात सुदृढ व्यक्ती असल्याचं वाटत होतं.' हा अनुभव शेअर करताना मुनमुनने 'अशा अनेक गोष्टी असतात, ज्यात आपण सर्वच गोष्टींसाठी कधीही तयार नसल्याचं' तिने म्हटलंय.   

3/6

मुनमुनने चढाई सुरु केल्यावर दोनच दिवसांत तिला क्लॉस्ट्रोफोबियामुळे पुन्हा परतावं लागलं. यामुळे तिला पॅनिक अटॅकही आला. त्यानंतर मुनमुनला चढाई करत असतानाच आपत्कालीन परिस्थितीत खाली आणण्यात आलं.

4/6

'पर्वतांवर अंधार पाहून हृदयाची धडधड वाढत होती. त्यामुळे मी बेशुद्धही झाल्याचंही' तिनं म्हटलं. यामुळे मुनमुनने आपली ट्रिप अर्धावर सोडून पुन्हा परतण्याचा निर्णय घेतला.

5/6

मुनमुनने ट्रिपदरम्यान तिला मदत करणाऱ्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. 

6/6

'या अनुभवातून मी खूप शिकले. एक व्यक्ती म्हणून मला आज खूप वेगळं वाटतंय. मी कोणत्याही अडचणींशिवाय समुद्रसपाटीपासून १२ हजार फूटांपर्यंत चढू शकली याचा मला अभिमान असल्याचंही' मुनमुनने म्हटलंय.