मध्यमवर्गीय लोकांचं कार घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार! टाटाची नवीन कार, किंमत फक्त...

सेफ्टी आणि मजबूत कारसाठी प्रसिद्ध असणाऱ्या टाटा कंपनीने टियागो श्रेणीमध्ये अपडेट केली आहे. 

Soneshwar Patil | Mar 17, 2025, 06:24 PM IST
1/7

टाटा मोटर्स कंपनीच्या सर्व कार या मजबूत आणि दमदार सेफ्टीसाठी ओळखल्या जातात. अशातच आता या कंपनीने त्यांच्या टियागो श्रेणीमध्ये बदल केला आहे. 

2/7

याआधी टाटा कंपनीच्या टियागो श्रेणीमध्ये ICE आणि EV हे दोन प्रकार होते. अशातच आता कंपनीने टियागो एनआरजी हे नवीन मॉडेल लॉन्च केले आहे. 

3/7

टियागो एनआरजी या नवीन कारची एक्स-शोरुम किंमत  7.20 लाख रुपयांपासून सुरु होते. याआधीची टियागो एनआरजी एक्सटी ट्रिम ही कार आता बंद करण्यात आली आहे. 

4/7

सध्या नवीन टियागो या कारमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. टाटा टियागो ही कार पेट्रोल  आणि सीएनजी या दोन्ही प्रकारामध्ये येते. 

5/7

टाटा टियागो एनआरजी कारमध्ये सर्वात मोठे अपडेट म्हणजे फ्री-स्टँडिंग 10.2 इंच टचस्क्रीन देण्यात आली आहे. जी वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते. 

6/7

तर या कारला टू-स्पोक स्टीअरिंग व्हील देण्यात आले आहे. ज्यामध्ये मध्यभागी लोगो आहे. त्यासोबतच सेंट्रल एमआयडीचा आकार हा मोठा करण्यात आला आहे. 

7/7

टाटा टियागो एनआरजीला 1.2 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. त्यासोबतच कारचा लूक देखील अनेकांना आवडला आहे. सध्या या कारची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.