close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

तेजस्विनीने साकारलेल्या नवदुर्गा पाहाच

समाजामध्ये जागृतता निर्माण करण्याचा प्रयत्न 

Oct 08, 2019, 12:25 PM IST

मुंबई :  नवरात्रीच्या मुहूर्तावर मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सृष्टीच्या विनाशाचं दाहक वास्तव नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून सर्वांपर्यंत पोहोचवले  आहेत. सोशल मीडियावर साकारण्यात आलेल्या नवदुर्गा चांगल्याच व्हायरल झाल्या.  

1/9

अंबाबाईपुढेही प्रश्न, म्हणाली 'पण मी अवतरणार तरी कशी ?'

अंबाबाईपुढेही प्रश्न, म्हणाली 'पण मी अवतरणार तरी कशी ?'

नवरात्रोत्सव म्हणजे एक असं पर्व जेव्हा प्रत्येक प्रसंगाचा धीराने सामना करणाऱ्या त्या 'स्त्री'च्या कर्तृत्वासाठी आणि तिच्या प्रत्येक निर्णयासाठी या दिवसांमध्ये जणू तिचे आभार मानले जातात.

2/9

'माझ्या लेकी वासनेला बळी पडतात'- कामाख्या

'माझ्या लेकी वासनेला बळी पडतात'- कामाख्या

महिलांना साक्षात देवीचं रूप मानलं जात. पण हिच स्त्री आज भूमीवर सुरक्षीत नाही. अत्याचार, बलात्कारा सारख्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. 

3/9

'....पण तुझ्या मनात काय सुरु आहे हे मात्र मला कळत नाही.'- जरीमरी आई

'....पण तुझ्या मनात काय सुरु आहे हे मात्र मला कळत नाही.'- जरीमरी आई

एकिकडे सारी सृष्टी म्हणजे कोणा एका दैवी शक्तीची देणगी आहे, असं म्हणत वरदानरुपी सृष्टीची पूजा करणारे तुम्ही आम्ही सर्वजण दुसरीकडे मात्र याच सृष्टीच्या विनाशाचं कारण ठरत आहोत. 

4/9

'लोभी रूप पाहुन मन माझं पिळवटून गेलं....'- महालक्ष्मी

'लोभी रूप पाहुन मन माझं पिळवटून गेलं....'- महालक्ष्मी

आजच्या या स्पर्धेच्या जगात मणुष्याला फक्त स्वत:ची खळगी भरायची आहे. माणसातली माणुसकी काळानुसार कमी होत आहे. आणि त्याच माणुसकीची जागा आता फक्त 'ये रे ये रे पैसा'नी घेतली आहे.

5/9

'माझ्या डोळ्यांदेखत मी उभारलेल्या सृष्टीचा विनाश होतोय'- शेरावाली माता

'माझ्या डोळ्यांदेखत मी उभारलेल्या सृष्टीचा विनाश होतोय'- शेरावाली माता

समतोल ढासळलाय......माझ्या डोळ्यांदेखत मी उभारलेली सृष्टी मला विनाश होताना दिसतेय....मी हतबल आहे...माझ्या हाती शस्त्र आहेत पण त्यांचा वापर करून तुमची हि वृत्ती मी कशी घालवणार? 

6/9

'भेगाळलेल्या भूमीवर फासावर लटकलेल्या भूमिपुत्रांची माता मी'- तुळजाभवानी

'भेगाळलेल्या भूमीवर फासावर लटकलेल्या भूमिपुत्रांची माता मी'- तुळजाभवानी

विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी महापूराने सर्वत्र थैमान घातले होते. एककाळ असा होता धरतीला पावसाच्या पाण्याची वाट पाहावी लागत होती. पण आता बळीराजा त्याच्या डोळयांनी सर्व काही वाहून जाताना बघत आहे. 

7/9

'वाहनांच्या कोलाहलात मला भक्तांची आर्जवे ऐकू येत नाहीत की समुद्राची गाज...'- मुंबा देवी

'वाहनांच्या कोलाहलात मला भक्तांची आर्जवे ऐकू येत नाहीत की समुद्राची गाज...'- मुंबा देवी

वाढत्या वाहनांमुळे सर्वत्र फक्त वाहतूक कोंडी परिणामी होणारं प्रदुषण. प्रगतीच्या मार्गाने पुढे जाणाऱ्या माणसाला निसर्गाचा मात्र विसर पडला आहे. रस्त्यांवर फक्त आणि फक्त ट्राफिक ही कसली प्रगती? असा प्रश्न तेजस्विनीने  लोकांना विचारला आहे. 

8/9

'आज त्यांचा संपतोय आणि कालांतराने तुमचा देखील'- गावदेवी

'आज त्यांचा संपतोय आणि कालांतराने तुमचा देखील'- गावदेवी

पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. अनेकांचा आश्रय आज माणसाने हिरावून घेतला. आज त्यांच्यावर वाईट काळ उद्या तुझ्यावर असेल. 

9/9

'तू जाळले मला जरी कृपाच वर्षवेन मी...'- पृथ्वी माता

'तू जाळले मला जरी कृपाच वर्षवेन मी...'- पृथ्वी माता

ऋग्वेदात पृथ्वीला 'माता' म्हटले आहे. माता म्हटल की ती तिच्या मुलांच्या सगळ्या चुका आपल्या पदरात घेत असते. पण आता तिच्या मुलांच्या चुका तिला असहाय्य होत आहेत.