समुद्राच्या मध्यभागी असलेला महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी किल्ला; शत्रूच्या बोटी किल्ल्याजवळ येताच फुटायच्या आणि सुमद्रात बुडायच्या

कोकणातील जगप्रसिद्ध जलदुर्ग! हा महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी किल्ला आहे. 

Vanita Kamble | Dec 02, 2025, 11:02 PM IST
twitter

Sindhudurg Fort : महाराष्ट्रातील किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. गिरीदुर्ग आणि भुईकोट किल्ल्यांसह महाराजांनी अनेक जलदुर्ग देखील बांधले.  कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरामारातील महत्वाचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची दूर दृष्टी आणि शौर्याचा साक्षीदार आहे.  समुद्राच्या मध्यभागी असलेला महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी किल्ला आहे. शत्रूच्या बोटी किल्ल्याजवळ येताच फुटायच्या आणि सुमद्रात बुडायच्या.   

1/8

 समुद्राच्या मधोमध असलेला हा किल्ला बांधकामाचे तंत्रज्ञानात, नैसर्गिक संरक्षण आणि अप्रतिम रचना यामुळे अत्यंत रहस्यमयी बनला आहे. हा किल्ला चारही बाजूंनी पाणी आणि खडकांनी वेढलेला आहे, ज्यामुळे शत्रूंना न दिसता जवळ जाणे अशक्य होते.   

twitter
2/8

किल्ल्याच्या भिंतींमध्ये प्रचंड आणि मोठ्या आकाराचे दगड वापरले आहेत, जे उष्ण हवामानातही थंड राहतात. तसेच, किल्ल्याच्या ईशान्येला असलेला गुप्त प्रवेशद्वार समुद्रामध्ये खोल असल्याने शत्रूंसाठी तो शोधणे खूप कठीण होते. 

twitter
3/8

 छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात 300 पेक्षा जास्त किल्ले उभारले. यापैकी एका किल्ल्यावर महाराजांच्या पावलांचे ठसे आहेत.

twitter
4/8

महाद्वारापासून उजव्या बाजूच्या तटावर दोन देवळ्या आहेत. यांपैकी एका देवळीत डाव्या पायाचा व दुसरीमध्ये उजव्या हाताचा ठसा आहे.  

twitter
5/8

 या किल्ल्यावर शिवराजेश्वर नावाचे मंदिर देखील आहे.  छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची पदचिन्हे असलेले हे मंदिर आहे. 

twitter
6/8

19 हेक्टर परिसरात सिंधुदुर्ग किल्ला पसरलेला आहे. किल्ल्याला 42 बुरुज आहेत. मजबूत भिंती आणि बुरुज यामुळे शत्रूच्या बोटींना किल्ल्याच्या जवळ येणे किंवा थेट हल्ला करणे शक्य नव्हते. शत्रूच्या बोटी किल्ल्याजवळ येताच फुटायच्या आणि सुमद्रात बुडायच्या.     

twitter
7/8

या किल्ल्याचे बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 ते 1667 दरम्यान केले होते. हिरोजी इंदुलकर या वास्तुविशारदांनी तीन हजार कामगारांच्या मदतीने तीन वर्षांत हा किल्ला बांधला. 

twitter
8/8

मुंबईपासून 450 किमी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग किल्ला आहे. कुडाळ,कणकवली आणि सावंतवाडी ही जवळची रेल्वे स्थानके आहेत.   

twitter