जगातील सर्वात विषारी वनस्पती; सापाच्या विषापेक्षाही धोकादायक असलेली 'ही' झाडं

जगात काही वनस्पती इतक्या विषारी असतात की त्यांचा स्पर्श किंवा सेवन सापाच्या विषापेक्षाही अधिक घातक ठरतो. या विषांचे त्वरीत परिणाम होतात आणि त्यावर कोणताही उपाय उपलब्ध नाही. जाणून घेऊयात कोण्तया वनस्पतींपासून आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो.   

Intern | Jun 10, 2025, 04:18 PM IST
twitter
1/8

Most Poisonous Plant: संपूर्ण जगात सापाला सर्वात विषारी प्राणी मानले जाते. जर सापाने चावले आणि वेळीच उपचार झाले नाहीत, तर त्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. मात्र, वनस्पतींच्या बाबतीतही काही झाडं आणि त्यांचे भाग इतके विषारी असतात की त्यांचा परिणाम सापाच्या विषापेक्षा अधिक घातक ठरतो. विशेषतः ही झाडं जर खाल्ली गेली किंवा त्वचेच्या संपर्कात आली, तर त्वरित मृत्यू होऊ शकतो. तर जाणून घेऊयात अशा काही वनस्पतींबद्दल ज्या जगातील सर्वाधिक विषारी मानल्या जातात.

twitter
2/8

मँचिनील

हे झाड पृथ्वीवरील सर्वात विषारी झाड मानलं जातं. त्याच्या फळांपासून, पानांपासून आणि अगदी सालीतूनही निघणारा रस इतका घातक असतो की, त्वचेच्या संपर्कात आल्यानंतर तीव्र जळजळ, फोड आणि डोळ्यांमध्ये अंधत्व निर्माण होऊ शकतं. त्याचा विषारी प्रभाव सापाच्या विषापेक्षाही वेगाने होतो. हे झाड कॅरिबियन, मध्य आणि दक्षिण अमेरिका भागात आढळते. याच्या फळांना 'डेथ अ‍ॅपल' असंही म्हणतात.

twitter
3/8

कॅस्टर बीन (एरंडेल)

या झाडाच्या बियांमध्ये रिसिन नावाचं एक अतिशय विषारी द्रव्य असतं. रिसिन हे सापाच्या विषापेक्षा कितीतरी अधिक घातक मानलं जातं. एखादी बी गिळली तरी ती प्राणघातक ठरू शकते. रिसिन शरीरातील पेशींना नष्ट करतं आणि काही तासांत मृत्यू ओढवू शकतो. यावर कोणता ठोस उपचारही उपलब्ध नाही आहे.  

twitter
4/8

डेडली नाईटशेड

या वनस्पतीची फळं आणि पानं फारच विषारी असतात. यात अ‍ॅट्रोपिन, स्कोपोलामाइन आणि हायओसायमाइनसारखे घटक असतात. याच्या सेवनामुळे पक्षाघात (Paralysis), हृदयविकार किंवा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. सुरुवातीला त्याचे परिणाम लगेच जाणवत नाही, पण काही काळातनंतर हे अत्यंत घातक ठरतात.  

twitter
5/8

रोसरी पी (गुंजा)

हिच्या लाल-काळ्या बियांना 'गुंजा' म्हणतात. या बियांमध्ये अ‍ॅब्रिन नावाचं विष असतं, जे रिसिनपेक्षाही अधिक घातक मानलं जातं. केवळ एक बी चघळल्याने देखील मृत्यू होऊ शकतो. ही वनस्पती भारतासह अनेक उष्णकटिबंधीय भागांमध्ये आढळते.

twitter
6/8

वॉटर हेमलॉक

ही वनस्पती उत्तर अमेरिकेतील सर्वात विषारी झाड मानली जाते. यामध्ये सिक्युटॉक्सिन नावाचं विष असतं. जे मज्जासंस्थेवर त्वरित परिणाम करतं. हे विष झटके, श्वासोच्छ्वास थांबवणं आणि मृत्यू घडवू शकतं. याचा परिणाम सापाच्या न्यूरोटॉक्सिनपेक्षाही जलद होतो.

twitter
7/8

सापाच्या विषाशी तुलना

सापाच्या विषामध्ये सामान्यतः न्यूरोटॉक्सिन, हेमोटॉक्सिन किंवा सायटोटॉक्सिन असते, जे शरीरातील नसा, रक्त किंवा ऊतींना धोका पोहोचवतं. त्याचे परिणाम काही तासांत जाणवतात आणि अँटी-वेनमच्या मदतीने उपचार करता येतात. मात्र, रिसिन, अ‍ॅब्रिन आणि सिक्युटॉक्सिनसारखी वनस्पती-जन्य विषारी द्रव्यं हे अधिक घातक असतात कारण त्यावर तातडीचा उपचार नसतो आणि ती शरीराच्या पेशींवर थेट परिणाम करतात.  

twitter
8/8

कशी घ्यावी काळजी?

अशा प्रकारच्या झाडांना घरात किंवा बागेत लावणे टाळावे. विशेषतः जिथे लहान मुले किंवा पाळीव प्राणी असतात तिथे. या वनस्पतींना ओळखणे आणि त्यांच्यापासून दूर राहणे हेच सुरक्षेचं प्रभावी साधन आहे.  

twitter