चित्रपटात रडण्यारीची भूमिका साकारली अन् एका रात्रीत झाली सुपरस्टार; 90 च्या दशकातील 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

दरवर्षी बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री येतात काही टिकून राहतात तर काही त्यांचं स्थान मिळवू शकत नाहीत. आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जी सध्या 68 वर्षांची आहे आणि जिनं कधीकाळी बॉक्स ऑफिसवर स्वत: चं असं स्थान निर्माण केलं ज्यामुळे तिची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढू लागली. पण तुम्हाला माहिती आहे का, एका चित्रपटामुळेच तिचं नशिब पालटलं?

Diksha Patil | Jun 10, 2025, 12:22 PM IST
twitter
1/8

आज आपण डिंपल कपाडिया यांच्याविषयी बोलतोय. त्या फक्त 14 वर्षांच्या होत्या आणि तेव्हाच राज कपूर यांनी ओळखलं की ही मुलगी एक मोठी अभिनेत्री होऊ शकते. त्याकाळात ‘मेरा नाम जोकर’ चित्रपट फ्लॉप गेला होता आणि आर. के. फिल्म्सवर कर्जाचं ओझं होतं. त्यांना असा एखादा चित्रपट हवा होता जो त्यांच्या बॅनरचं नशीब पालटेल आणि त्यांना पुन्हा एकदा स्थिरावर आणेल.  

twitter
2/8

तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की त्यांचा 21 वर्षांच्या मुलगा ऋषि कपूरला डिंपलसोबत ‘बॉबी’ चित्रपटात लॉन्च करायचं. ‘बॉबी’ प्रदर्शित झाला तेव्हा डिंपल फक्त 16 वर्षांच्या होत्या. पण यश काय असतं हे समजून घेण्या आधीच त्यांचं आणि राजेश खन्ना यांचं लग्न झालं. 

twitter
3/8

राजेश खन्ना यांना असं वाटत होतं की त्यांच्या पत्नीनं मुलींना जन्म दिल्यानंतर घरी रहावं आणि ते अभिनय करत राहतील. 1980 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत राजेश खन्ना म्हणाले की, 'मला काहीच हरकत नाही, डिंपलला चित्रपटात काम करायचं असेल तर तिनं करावं. पण माझं लग्न झालं तेव्हा मला एक आई हवी होती, जी माझ्या मुलांचा सांभाळ करेल. मला डिंपलच्या टॅलेंटबद्दल फारसं माहित नव्हतं कारण ‘बॉबी’ तेव्हा प्रदर्शित झाला नव्हता.' 

twitter
4/8

या सगळ्याचा परिणाम असा झाला की डिंपल यांचं करिअर तिथेच थांबलं. बर्‍याच वर्षांनी, डिंपल यांनी रमेश सिप्पी यांच्या 'सागर' या चित्रपटातून कमबॅक केलं. 

twitter
5/8

दरम्यान, डिंपल या तेव्हा 'सागर' हा चित्रपट केला जेव्हा त्या राजेश खन्ना यांच्यापासून विभक्त झाल्या. डिंपल यांनी सिंगल मदर होऊन त्यांच्या दोन्ही मुलांना सांभाळलं. 

twitter
6/8

‘अल्ला रक्खा’, ‘बीस साल बाद’, ‘पति परमेश्वर’ अशा काही चित्रपटांनंतर डिंपल यांना एक अशी भूमिका मिळाली जी त्यांच्या करिअरसाठी महत्त्वाची ठरली. तो चित्रपट म्हणजे 1993 मध्ये प्रदर्शित झालेला ‘रुदाली’ आहे. 

twitter
7/8

या चित्रपटात डिंपल यांनी एक रुदाली म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर तिथे जाणून रडणारी स्त्री. आता ती स्त्री या कामासाठी पैसे घेते हा एक प्रकारचा व्यवसाय आहे. महत्त्वाचं म्हणजे हा शब्द आणि हा व्यवसाय राजस्थानच्या काही ठिकाणी होता. इथल्या महिलांना बराच काळ एकांतात सगळ्यांपासून लांब ठेवतात आणि कोणत्या मृत्यूनंतर शोक करण्यासाठी त्यांना बोलावतात. 

twitter
8/8

या चित्रपटानं डिंपल यांचं करिअर असं बदललं की त्यांना या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा नॅशनल अवॉर्ड पुरस्कार मिळाला. 

twitter