घरच्या घरीच बनवा हॉटेलसारखा मऊ आणि जाळीदार ढोकळा, या टिप्स लक्षात ठेवा

रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी मुलं अनेकदा चमचमीत पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. अशावेळी गृहिणी घरातच नवनवीन पदार्थांच्या रेसिपी ट्राय करतात. मात्र, कधीतरी या रेसिपी बिघडतात आणि मुलांचाही मुड ऑफ होतो. 

| Jun 14, 2023, 19:45 PM IST

Dhokla Recipe In Marathi: रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी मुलं अनेकदा चमचमीत पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. अशावेळी गृहिणी घरातच नवनवीन पदार्थांच्या रेसिपी ट्राय करतात. मात्र, कधीतरी या रेसिपी बिघडतात आणि मुलांचाही मुड ऑफ होतो. 

1/6

घरच्या घरीच बनवा हॉटेलसारखा मऊ आणि जाळीदार ढोकळा, या टिप्स लक्षात ठेवा

Tips to make fluffy Dhokla at home in marathi

ढोकळा ही गुजराती डिश जरी असली तरी महाराष्ट्रातही अनेकजण आवडीने खातात. अनेकदा सुट्टीच्या दिवशी ढोकळा बनवला जातो. मात्रस कधीतरी रेसिपी फसते आणि सगळ्यांचाच मूड ऑफ होतो. हॉटेलसारखा ढोकळा घरच्या घरी कसा बनवायचा याची रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

2/6

परफेक्ट बॅटर

Tips to make fluffy Dhokla at home in marathi

 ढोकळ्यासाठी बनवलेले बॅटर अधिक घट्ट किंवा जास्त पातळंही करु नका. बॅटर व्यवस्थित झालंय का तपासण्यासाठी पाण्याचा एक थेंब बॅटरमध्ये टाका. जर पाण्याचा थेंब वर तरंगत असेल तर तुमचं बॅटर परफेक्ट झालं आहे. 

3/6

मगच ढोकळा बनवा

Tips to make fluffy Dhokla at home in marathi

ढोकळ्याचे बॅटर तयार झाल्यानंतर १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा. त्यानंतरच ढोकळा बनवायला घ्या 

4/6

तेल लावून सेट करा

Tips to make fluffy Dhokla at home in marathi

ज्या भांड्यात ढोकळा करणार आहात त्याला आधी व्यवस्थित तेल लावून  सेट होण्यासाठी ठेवून द्या

5/6

इनो टाका

Tips to make fluffy Dhokla at home in marathi

बॅटर व्यवस्थित फुलल्यानंतरच त्यात ईनो किंवा बेकिंग पावडर टाका. त्यानंतर बॅटर व्यवस्थित फेटून घ्या. त्याआधी त्याधी इनो टाकू नका.

6/6

सुरीवर तेल लावा

Tips to make fluffy Dhokla at home in marathi

ढोकळा तयार झाल्यानंतर तो व्यवस्थित कापण्यासाठी सुरीवर तेल लावायला विसरू नका