दंड वाचवण्यासाठी त्याने लढवली अनोखी शक्कल

Sep 15, 2019, 14:27 PM IST
1/5

वडोदरा शहरातील विजयनगर येथे राहणारे आणि इन्शुरन्स कंपनीमध्ये सल्लागार या पदावर कार्यरत असलेले ५० वर्षीय रामपाल शाह यांनी एक अनोखं हेल्मेट बनवलं आहे.

2/5

रामपाल शाह यांनी त्यांच्या हेल्मेटवर गाडीसंबंधी ड्रायव्हिंग लायसन, आरसी बुक, पीयूसी आणि गाडीच्या इन्शुरन्सचे सर्व आवश्यक कागदपत्र चिकटवले आहेत. त्यांना कधीही वाहतूक पोलिसांकडून अडवण्यात येतं आणि कागदपत्रांची विचारणा करण्यात येते, त्यावेळी ते सरळ हेल्मेट काढून ट्रॅफिक पोलिसांच्या हातात ठेवतात.   

3/5

ज्यावेळी रामपाल शाह त्यांची बुलेट आणि अनोखं हेल्मेट घेऊन रस्त्यांवरुन निघतात. त्यावेळी सर्वांच्याच नजरा त्यांच्यावर असतात. रामपाल शाह यांचं हेल्मेट आकर्षणाचं केंद्र ठरत आहे.  

4/5

रामपाल यांच्या भावाने याबाबत बोलताना सांगितलं की, आता वाहतुकीचे नियम अधिक कठोर होत आहेत. जर सर्वच वाहन चालक हेल्मेटसह, गाडीचे आवश्यक कागदपत्र घेऊनच बाहेर पडले तर हे नियम पाळताना कोणताच त्रास होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

5/5

लोकांना माझं आवाहन आहे की, सर्वांनी हेल्मेट वापरा आणि गाडीचे सर्व कागदपत्रही जवळ ठेवा. म्हणजे तुम्हाला दंड भरावा लागणार नाही आणि कोणत्याही त्रासाविना आपण आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचू शकतो. असं रामपाल शाह यांनी सांगितलं. रामपाल यांची ही कागदपत्र जवळ ठेवण्याची पद्धत नक्कीच वेगळी आहे. पण त्यातून सकारात्मक संदेशही इतरांपर्यंत पोहचतोय हेदेखील तितकंच खरं आहे.