मिनिटाला करोडो रूपये कमवणाऱ्या टॉप ५ कंपन्या

दिवसाला अब्जो रूपयांचा गल्ला जमवतात   

Dec 12, 2019, 13:25 PM IST

मुंबई : जगात काही अशा कंपन्या आहेत ज्या तासात कोटी आणि दिवसाला अब्ज रूपयांचा गल्ला जमा करतात. तर या कंपन्यांमधील अनेक मोठ्या कंपन्यांचा व्यवसाय छोट्या देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. तर अशा काही कंपन्या ज्या तासात कोट्यांवधींचा व्यवसाय करतात. 

1/5

सौदी अरामको

सौदी अरामको

एका मिनिटात सर्वाधिक कमाई करणार्‍या कंपन्यांमध्ये पहिले नाव सौदी अरेबियाची कंपनी 'अरामको'चे आहे. एका दिवसात २१.५८ अब्जपेक्षा जास्त कमाई करणार्‍या या कंपनीची मिनिटांची कमाई १५ कोटींपेक्षा जास्त आहे. ही एक तेल कंपनी आहे. शेअर बाजारात देखील कंपनीची सुरूवात दणक्यात झाली आहे. 

2/5

अॅप्पल

अॅप्पल

मोबाईलसाठी प्रसिद्ध असलेली कंपनी म्हणजे 'अॅप्पल'. ही कंपनी या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. अॅप्पल कंपनी एका मिनिटाला ८०.६३ लाख रूपयांपेक्षा देखील जास्त गल्ला जमवते, तर दिवसाला ११.१६ अब्ज रूपयांच्या वर मजल मारते. 

3/5

इंडस्ट्रियल आणि कमर्शियल बँक ऑफ चायना

इंडस्ट्रियल आणि कमर्शियल बँक ऑफ चायना

यादी मध्ये तिसऱ्या स्थानी इंडस्ट्रियल आणि कमर्शियल बँक ऑफ चायना आहे. ही बँक मिनिटाला ६०.९५ लाख रूपयांपेक्षा अधिक पैसे कमवते, तर दिवसाला ८.७७ अब्ज रूपयांचा गल्ला जमा करते.

4/5

सॅमसंग

सॅमसंग

सर्वात जास्त कमाई करणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये चौथा क्रमांक 'सॅमसंग' कंपनीचा लागतो. ही कंपनी मिनिटाला ५४.०३ लाख रूपये आणि दिवसाला ७.७८ अब्ज रूपयांवर मजल मारते.   

5/5

चायना कंस्ट्रक्शन बँक

चायना कंस्ट्रक्शन बँक

जगात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या कंपन्यांमध्ये चायना मधील चायना कंस्ट्रक्शन बँक पाचव्या स्थानावर आहे. CCB प्रत्येक मिनिटाला ५२.१४ लाख  रूपयांचा गल्ला जमवते.