मृत्यूचे रनवे...! जगभरातील धोकादायक रनवे जिथे पायलयटही श्वास रोखून धरतात

रविवारी नेपाळमध्ये एक मोठी विमान दुर्घटना झाली, ज्यामध्ये 72 लोकांना बळी गमवावा लागला. नेपाळमध्ये झालेला हा अपघात काही पहिलाच अपघात नव्हे. आज आम्ही तुम्हाला जगभरातील असेच काही एअरपोर्टबाबत माहिती देणार आहोत, ज्याठिकाणी विमान उड्डाण घेण्यापासून ते लँडिंग करण्याच्या दृष्टीने धोकादायक मानलं जातं. एक छोटीशी चूक अपघाताचं कारण बनून हे मृत्यूचे रनवे ठरू शकतात.

Jan 17, 2023, 17:01 PM IST
1/5

कौरशेवेल एअरपोर्ट, फ्रान्स- हे जगातील सर्वात छोटं एअरपोर्ट मानलं जातं. मुळात याला अशाच पद्धतीने तयार करण्यात आलं आहे. याच्या रनवेची लांबी 537 मीटर आहे. हे डोंगरांच्या मध्ये बनवण्यात आलं आहे. त्यामुळे या ठिकाणी लँडिंग करणं कठीण मानलं जातं.  

2/5

लुकला एयरपोर्ट, नेपाळ-  नेपाळचं हे एअरपोर्ट जगातील सर्वात धोकादायक मानण्यात येतं. या रनवेभोवती 600 मीटर खोल खंदक आहे. 

3/5

टोनकॉन्टिन आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, होंडुरास- होंडुरासचे टोनकॉन्टिन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे इथल्या शहराच्या केंद्रापासून 6 किलोमीटर दूर अंतरावर आहे. डोंगराळ भाग असल्याने या ठिकाणी पायलटला सुरक्षित लँडिंग तसंच टेकऑफसाठी खूप संघर्ष करावा लागतो. 

4/5

बारा इंटरनेशनल एयरपोर्ट, स्कॉटलंड- या एअरपोर्टला बारा इओगरी म्हणून देखील ओळखलं जातं. या एअरपोर्टचं रनवे अतिशय लहान आणि धोकादायक आहे. 

5/5

वेलिंग्टन इंटरनेशनल एयरपोर्ट, न्यूझीलंड- न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टनमध्ये रोंगोटोई याठिकाणी असलेलं हे एअरपोर्ट शहराच्या आग्नेयेस 5.5 किमी अंतरावर आहे. त्याचं रनवे फक्त 6351 फूट इतकं आहे.