टीव्ही अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या, हे होतं शेवटचं What'sApp स्टेटस

May 28, 2020, 16:07 PM IST
1/5

प्रसिद्ध मालिका क्राईम पेट्रोलमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या अभिनेत्रीने सोनी टीव्ही आणि कलर्स वरील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक व्हॉटस्अप स्टेटस ठेवलं होतं. ज्यामध्ये तिने म्हटलं होतं की, 'सबसे बुरा होता है सपनों का मर जाना.'

2/5

करिअरच्या भीतीने आत्महत्या केली की पडद्यामागे आणखी काही आहे याचा तपास पोलीस करत आहेत. लॉकडाउनमुळे असे अनेक लोकं आहेत. ज्यांना काम आणि करिअरचा प्रश्न भेडसावत आहे.

3/5

अभिनेत्रीच्या वडिलांनी म्हटलं की, लॉकडाऊन असल्याने ती मुंबईहून घरी परतली होती. पण लॉकडाऊन वाढत असल्याने तिला पुन्हा काम मिळणार नाही या विचारात ती डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यामुळे तिने हे पाऊल उचललं. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

4/5

इंदौरच्या बजरंग नगर येथे या टीव्ही अभिनेत्रीने फाशी घेत आत्महत्या केली. मुंबईत येऊन तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं. क्राईम पेट्रोल या मालिकेतही तिने काम केलं आहे.

5/5

खूबसूरत बहू, बूंदें, राक्षस, प्रतिबिंब, पार्टनर्स, हां, थ्रिल, अधूरी औरत’ सारख्या नाटकांमध्ये तिनें काम केलं होतं. तिच्या अभिनयासाठी तिला 3 राष्ट्रीय नाट्य उत्सवांमध्ये फर्स्ट प्राईज देखील मिळालं होतं. एकपात्री नाटक ‘सड़क के किनारे” साठी देखील तिला पुरस्कार मिळाला होता.