हीच ती वेळ... हाच तो क्षण.....

Nov 27, 2019, 10:02 AM IST
1/11

हीच ती वेळ... हाच तो क्षण.....

महाराष्ट्रात जवळपास महिन्याभरापासून सुरु असणाऱ्या राजकीय नाट्याचा पहिला अंक अखेर मंगळवारी संपला. पूर्वार्धात सत्ता नेमकी कोणाच्या हाती जाणार याची धाकधूक सर्वसामान्य जनतेला लागलेली असतानाच, मंगळवारच्या उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाराष्ट्रविकास आघाडीचं सरकार राज्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. 

2/11

हीच ती वेळ... हाच तो क्षण.....

वक्तव्य, अधिकृत आणि औपचारिक पत्रकार परिषदा, घोषणा हे सारंकाही साग्रसंगीत पार पडलं आणि अखेर सत्तेचा बेत जुळून आला. महाराष्ट्रविकास आघाडीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी एकमताने महाराष्ट्रविकासआघाडीचे नेते म्हणून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांची निवड करत त्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली.  (छाया सौजन्य- राजेश वराडकर)

3/11

हीच ती वेळ... हाच तो क्षण.....

महाराष्ट्रविकासआघाडीच्या या यशाचे साक्षीदार होण्याच्या निमित्ताने अनेक कार्यकर्ते, आमदार यांची मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये उपस्थिती पाहायला मिळाली. (छाया सौजन्य- राजेश वराडकर)

4/11

हीच ती वेळ... हाच तो क्षण.....

ज्येष्ठ नेत्यांपासून नव्या जोमाच्या आमदारांपर्यंत सर्वजण या क्षणाचे साक्षीदार होत होते. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)

5/11

हीच ती वेळ... हाच तो क्षण.....

उद्धव ठाकरे आता एका नव्या कारकिर्दीची सुरुवात करण्यास सज्ज होत असतानाच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असणारं त्यांचं कुटुंब, म्हणजेच पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य, तेजसही उपस्थित होते. (छाया सौजन्य- राजेश वराडकर)

6/11

हीच ती वेळ... हाच तो क्षण.....

या क्षणी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील भावच सर्वकाही सांगून जात होते. (छाया सौजन्य- राजेश वराडकर)

7/11

हीच ती वेळ... हाच तो क्षण.....

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला अगदी जवळून जाणणाऱ्या शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीच्या अनुभवाचं दर्शन पुन्हा एकदा पाहायला मिळालं. (छाया सौजन्य- राजेश वराडकर)

8/11

हीच ती वेळ... हाच तो क्षण.....

महाराष्ट्रविकासआघाडीच्या बैठकीमध्ये काही भावनिक क्षण, आनंदाची उधळणही पाहायला मिळाली. फक्त शरद पवारच नव्हे, तर अजित पवार वगळता त्यांच्या कुटुंबातील राजकारणात सक्रिय असणाऱ्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचीही यावेळी उपस्थिती पाहायला मिळाली.  (छाया सौजन्य- सोशल मीडिया)

9/11

हीच ती वेळ... हाच तो क्षण.....

मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर किशोरी पेडणेकर यांनीही यावेळी उद्धव ठाकरे यांचं सहृदय अभिनंदन केलं.  (छाया सौजन्य- राजेश वराडकर)

10/11

हीच ती वेळ... हाच तो क्षण.....

हिच ती वेळ... हाच तो क्षण असं म्हणत आजवर अनेक राजकीय पक्षांनी विशेषत: शिवसेनेना नेत्यांनी अनेक प्रचारसभांमध्ये महाराष्ट्राप्रतीचा आपलेपणा व्यक्त करत मतदारारुपी सामान्य जनतेला आवाहन केल्याचं पाहायला मिळालं होतं. (छाया सौजन्य- राजेश वराडकर)

11/11

हीच ती वेळ... हाच तो क्षण.....

आता खऱ्या अर्थाने वेळ आणि क्षण यांचं गणित नेमकं साधलं जात असल्याचं चित्र महाविकासआघाडीला पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- राजेश वराडकर)