close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

#throwback : अभिषेक- ऐश्वर्याच्या विवाहसोहळ्याचा न पाहिलेला राजेशाही थाट...

Aug 22, 2019, 10:59 AM IST
1/7

बॉलिवूडमध्ये काही कलाकारांच्या कुटुंबांना प्रतिष्ठेचं स्थान आहे. खान, कपूर अशा या कुटुंबाच्या यादीतील किंबहुना सर्वांच्या आवडीचं आणि तितक्याच प्रतिष्ठेचं एक कुटुंब म्हणजे 'बच्चन' कुटुंब. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम / @abujanisandeepkhosla)

2/7

कायमच प्रकाशझोतात असणाऱ्या या कुटुंबाचे अनेक फोटो म्हणजे चाहत्यांसाठी परवणी. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम / @abujanisandeepkhosla)

3/7

बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे असेच काही सुरेख फोटो सर्वांच्या भेटीला आणले आहेत सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला या जोडीने. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम / @abujanisandeepkhosla)

4/7

फॅशन विश्वात नावाजलेल्या या जोडीने त्यांच्या ब्रँडला ३३ वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या विवाहसोहळ्यातील काही खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम / @abujanisandeepkhosla)  

5/7

संगीत सोहळ्यापासून विवाह समारंभापर्यंतचे फोटो पोस्ट करत त्यांनी या प्रत्येक फोटोमध्ये बच्चन कुटुंबीयांच्या राजेशाही पेहरावाविषयीसुद्धा माहिती दिली आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम / @abujanisandeepkhosla)

6/7

फॅशन आणि पारंपरिकतेची शान राखत पेहरावामध्ये तितकाच साधेपणा जपला गेल्याचं या विवाहसोहळ्या पाहाय़ला मिळालं होतं. पण, त्याचवेळी त्याच असणारा दिमाख मात्र कमी झालेला नव्हता. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम / @abujanisandeepkhosla)

7/7

प्रत्येक फोटो बरंच काही सांगून जात आहे. कुठे भावना, कुठे उत्साह तर कुठे लग्नघरामध्ये असणारी लगबग आणि धमालही पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम / @abujanisandeepkhosla)