LPG गॅसच्या तुटवड्यामुळे वडापाव महागला, ठाणेकरांच्या खिशावर भार, आता मोजावे लागणार इतके रुपये

सर्वसामान्यांच्या खिशाला परडवणारा आणि आवडता वडापावदेखील महागला आहे. वडापाव विक्रेत्यांनीही वडापावचा दर वाढवला आहे.   

Shivraj Yadav | Mar 16, 2026, 05:19 PM IST
twitter
1/8

इराण - इस्रायल अमेरिका युद्धाचा फटका आता जगाला बसत असून, त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. महाराष्ट्रात देखील गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून, लोक रांगा लावत आहेत.  

twitter
2/8

सर्वात जास्त फटका हॉटेल उद्योगाला बसला असून, त्यांना आता चूल आणि इतर पर्यायांना पसंती दर्शवली आहे.   

twitter
3/8

अनेक हॉटेल्सनी शिजण्यासाठी जास्त वेळ लागणारे पदार्थ मेन्यूमधून काढून टाकले आहेत. यामुळे खवय्यांना आता आपल्या आवडत्या पदार्थांसाठी मुरड घालावी लागत आहे.   

twitter
4/8

यादरम्यान आता सर्वसामान्यांच्या खिशाला परडवणारा आणि आवडता वडापावदेखील महागला आहे. वडापाव विक्रेत्यांनीही वडापावचा दर वाढवला आहे.   

twitter
5/8

ठाण्यात वडापाव महागला असून, तो 5 रुपयांनी महाग झाला आहे. एलपीजी गॅस च्या तुटवड्याचा फटका आता ठाण्यात वडापाव प्रेमींना देखील बसला आहे.   

twitter
6/8

ठाण्यात वडापाव 5 रुपयांनी महाग झाला आहे. अनेकजण जेवणाचे पैसे नसल्याने पोट भरण्यासाठी खाणारा वडापाव आता खिशावर भार देत आहे.   

twitter
7/8

ठाण्यातील सुप्रसिद्ध गजानन वडापाव व समोसा पावदेखील पाच रुपयांनी महागला आहे.   

twitter
8/8

दरम्यान लोकांनी यावर प्रतिक्रिया देताना वडापाव महागला तरी आम्ही खाणार अशी प्रतिक्रिया दिली आहे. पण वाढलेले हे दर नंतर कमी होतील की नाही? आणि किती दिवस हा दर असाच राहणार? हेदेखील महत्वाचं आहे.   

twitter