#ValentinesDay2020 : रजनीकांत आणि लता यांची लव्ह स्टोरी

| Feb 14, 2020, 08:13 AM IST
1/8

#ValentinesDay2020 : रजनीकांत आणि लता यांची लव्ह स्टोरी

#ValentinesDay2020 : रजनीकांत आणि लता यांची लव्ह स्टोरी

मुंबई : साऊथमध्ये अगदी देवाप्रमाणे पूजणाऱ्या सुपरस्टार रजनीकांत यांची आज व्हॅलेंटाईन डे निमित्त आपण प्रेमकहाणी जाणून घेणार आहोत. रजनीकांत यांची जादू फक्त साऊथमध्येच नाही तर संपूर्ण देशभर पसरली आहे. रजनीकांत यांचे सिनेमे फक्त साऊथमध्येच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरतात. रजनीकांत यांची क्रेझ इतकी आहे की त्यांचा प्रत्येक सिनेमा हा सोहळ्याप्रमाणे साजरा होतो. त्यांची खास लव्हस्टोरी 

2/8

#ValentinesDay2020 : रजनीकांत आणि लता यांची लव्ह स्टोरी

#ValentinesDay2020 : रजनीकांत आणि लता यांची लव्ह स्टोरी

रजनीकांत आणि लता यांच्या लग्नाला  38 वर्षे पूर्ण झाली आहेत. पण असं असलं तरीही आजही त्यांच प्रेमही आहे तसंच आहे. 1980 ची गोष्ट रजनीकांत त्यावेळी बालाचंदर यांच्या तामिळ सिनेमा 'थिल्लू मल्लू'चं शुटिंग करत होते. हा सिनेमा 1979 मध्ये बॉलिवूडमध्ये आलेल्या 'गोलमाल'ची रिमेक होती. हाच रजनीकांत यांचा पहिला कॉमेडी सिनेमा. 

3/8

#ValentinesDay2020 : रजनीकांत आणि लता यांची लव्ह स्टोरी

#ValentinesDay2020 : रजनीकांत आणि लता यांची लव्ह स्टोरी

याच सिनेमाच्या शुटिंग दरम्यान रजनीकांत यांना एका मुलाखतीबाबत विचारण्यात आलं. ही मुलाखत एका कॉलेज मॅगझीनकरता होती. यावेळी मुलाखत घेण्याकरता कॉलेजकडून लता यांना पाठवण्यात आलं. आणि तेव्हाच रजनीकांत लता यांना पहिल्यांदा बघून प्रेमातच पडले. मुलाखतीदरम्यान बंगलुरू कनेक्शन निघालं आणि दोघं अतिशय कर्म्फटेबल झाले. 

4/8

#ValentinesDay2020 : रजनीकांत आणि लता यांची लव्ह स्टोरी

#ValentinesDay2020 : रजनीकांत आणि लता यांची लव्ह स्टोरी

रजनीकांत यांनी बंगलुरू ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये बस कंडक्टरची नोकरी केली होती. तसेच लता यांच घर बंगलुरूमध्ये होतं यामुळे दोघांमध्ये जास्त जवळीक झाली. या मुलाखती दरम्यान त्यांना जाणवलं की, रजनीकांत सुपरस्टार असून किती मनमोकळ्या गप्पा मारत आहेत. 

5/8

#ValentinesDay2020 : रजनीकांत आणि लता यांची लव्ह स्टोरी

#ValentinesDay2020 : रजनीकांत आणि लता यांची लव्ह स्टोरी

मुलाखती दरम्यानच रजनीकांत यांना जाणीव झाली की, ते ज्या जोडीदाराची वाट पाहत आहेत. त्या लताच आहेत. आणि ही गोष्ट त्यांच्या डोक्यात संपूर्ण मुलाखती दरम्यान होती. एवढंच काय तर त्यांनी मुलाखत संपताच लता यांना लग्नासाठी प्रपोझ केलं.

6/8

#ValentinesDay2020 : रजनीकांत आणि लता यांची लव्ह स्टोरी

#ValentinesDay2020 : रजनीकांत आणि लता यांची लव्ह स्टोरी

पहिल्याच मुलाखतीनंतर लग्नाचं प्रपोझ ऐकताच लता हैराण झाल्या. मात्र त्यांनी अगदी हसत त्यांना सांगितलं की, मला माझ्या पालकांशी बोलावं लागेल. दोघांनी तात्काळ पालकांना भेटण्याचा निर्णय घेतला आणि एकमेकांना काहीसा वेळ दिला. 

7/8

#ValentinesDay2020 : रजनीकांत आणि लता यांची लव्ह स्टोरी

#ValentinesDay2020 : रजनीकांत आणि लता यांची लव्ह स्टोरी

रजनीकांत खूप नरवस होते की लता यांचे पालक लग्नासाठी तयार होतील की नाही. मात्र दोघांचे आई-वडिल अगदी लगेच तयार झाले. यानंतर रजनीकांत यांनी 26 फेब्रुवारी 1981 मध्ये लतासोबत लग्न केलं.

8/8

#ValentinesDay2020 : रजनीकांत आणि लता यांची लव्ह स्टोरी

#ValentinesDay2020 : रजनीकांत आणि लता यांची लव्ह स्टोरी

 लता आणि रजनीकांत यांना दोन मुली आहेत. ऐश्वर्या आणि सौंदर्या. ऐश्वर्याचं लग्न धनुषसोबत झालं असून तो देखील लोकप्रिय अभिनेता आहे.