'वंदे मातरम्' म्हणतं पोलिसाने केला लिंगाणा किल्ला सर

'वंदे मातरम्' म्हणतं पोलिसाने केला लिंगाणा किल्ला सर

| Jan 27, 2021, 10:24 AM IST

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगली जिल्ह्यातील पोलिसाने केला लिंगाणा किल्ला सर. लिंगाणा किल्ला सर करणारे विजय घोलप हे सांगली जिल्ह्यातील पहिले पोलिस. 4 हजार फूट किल्ल्यावर जाऊन प्रजासत्ताक दिना दिवशी फडकवला तिरंगा. यामुळे सगळीकडेच विजय घोलप यांचं कौतुक होत आहे. 
 

1/6

सांगली पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस हवालदार विजय घोलप यांनी लिंगाणा किल्ला सर केला आहे. 

2/6

कोल्हापूर हेकर्स या टीम सोबत त्यांनी हा किल्ला चढला आहे. 4 हजार फुट किल्ल्यावर जाऊन विजय घोलप आणि त्यांच्या टीमने 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिना दिवशी  तिरंगा फडकावला आहे. लिंगाना सर करताना थरार अनुभवला आहे.   

3/6

 रात्री 3 वाजता लिंगाणा किल्ला सर करायला सुरुवात केली तर सकाळी 10 वाजता लिंगाणाच्या टोकावर हे सर्व जण पोहचले तर किल्यावर पोहचल्या वर राष्ट्रगीत आणि वंदेमातरम ही गायिले. 

4/6

दुपारी 3 च्या दरम्यान हे 13 जण ट्रेकर खाली आले. महाराष्ट्रातील सर्वात उंच असणारे कळसू बाई हे ठिकान गेल्या वर्षी पोलीस हवालदार विजय घोलप यांनी सर केले होते.

5/6

6/6