Vidhan Parishad Election : महाराष्ट्रात सध्या विधान परिषदेचे निवडणूक होणार आहेत. पण 1996 च्या विधान परिषद निवडणुकीत विलासराव देशमुख फक्त अर्ध्या मतानं निवडणूक हरले त्यामुळेच पुढे मुख्यमंत्रीच झाले. काय आहे हा किस्सा जाणून घेऊयात.
1/8महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक रंजक किस्से आहेत जे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित होणार आहात. राज्यात विधान परिषदेत निवडणूक होणार आहेत. त्यानिमित्त 1996 च्या विधान परिषदेच्या वेळी विलासराव देशमुख यांच्या किस्सा आजही पत्रकारांना आठवतो.
2/81995 सालच्या विधानसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघातून विलासराव देशमुखांचा पराभव झाला होता. जनता दलाचे उमेदवार शिवाजीराव कव्हेकरांनी देशमुखांचा पराभव केला होता. त्यामुळे या पराभवाची राजकारणात मोठी चर्चा झाली होती.
3/8त्यानंतर 1996 च्या विधान परिषद निवडणुकीमध्ये विलासराव देशमुखांना संधी मिळू नये अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती. मग त्यावेळी शरद पवारांचे समर्थक असलेले छगन भुजबळांचं नाव निवडणुकीसाठी देण्यात आलं.
4/8मग काय अशा परिस्थितीत विलासराव देशमुखांनी बंडखोरी केली. त्यांनी अपक्ष म्हणून विधान परिषद निवडणूक लढवली. त्यावेळी शिवसेनेने विलासरावांची साथ दिली होती.
5/8तुम्हाला माहिती नसेल तर त्यावेळी शिवसेनेने विलासराव यांना शिवसेनेत येण्याची ऑफर बाळासाहेब ठाकरेंनी दिली होती. त्यावेळी विलासराव देशमुखांच्या उत्तराने महाराष्ट्राचे मनं जिंकलं होतं. ते म्हणाले होते की, माझ्या रक्तातील काँग्रेस तुम्ही कशी काढणार?
6/8त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढलेले विलासराव देशमुख फक्त अर्ध्या मताने हारले होते. मग अशात राज्यात शिवसेना -भाजप युतीचं सरकार असल्याने विलासरावांनी विरोधक म्हणून त्यांना उत्तर दिली.
7/81995 मध्ये विधानसभेत आणि 1996 ला विधान परिषदेत अशा दोन निवडणुकीत सलग दोन वेळा विलासरावांचा पराभव झाला. पण त्यांनी 1999 साली पुन्हा लातूरमधून विधानसभा निवडणूक लढवली आणि यावेळी ते सर्वाधिक मताधिक्क्याने जिंकले होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री झालेत.
8/8त्यावेळी विलासराव म्हणाले की, मी अर्ध्या मतानं पडलो बरं झालं. जिंकलो असतो तर शिवसेनेमध्येच अडकून पडलो असतो. त्या पराभवामुळे पुन्हा काँग्रेसमध्ये काम करू शकलं आणि मुख्यमंत्री झालो.