close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

देशाभिमान द्विगुणित करणारे 'हे' चित्रपट पाहाच...

भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७२ वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रत्येक दिवसाचे एक महत्व असते.

Aug 15, 2019, 08:39 AM IST

मुंबई : भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७२ वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रत्येक दिवसाचे एक महत्व असते. त्याचप्रमाणे आज संपूर्ण देशासाठी सर्वाधिक महत्वाचा दिवस आहे. या खास दिवसाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साह असताना काही बॉलिवूड चित्रपटांच्या माध्यमातूनही स्वातंत्र लढ्याला उजाळा देण्यात य़ेत आहे. ८० आणि ९०च्या दशकात भारत देशाच्या स्वातंत्र लढ्यावर अनेक चित्रपट साकारण्यात आले. देशावर आधारित चित्रपट साकारण्यात अभिनेते मनोर कुमार यांचं यात सर्वाधिक मोलाचं योगदान आहे. 

1/5

क्रांती

क्रांती

१९८१ मध्ये प्रतर्शित झालेला 'क्रांती' चित्रपट देशप्रेमावर आधारलेला होता. या मल्टीस्टारर चित्रपटामध्ये मनोज कुमार, दिलीप कुमार, शत्रुघ्न सिन्हा, शशी कपूर, मदन पुरी, टॉम ऑल्टर, परवीन बाबी आणि हेमा मालिनी हे कलाकार झळकले होते. 

2/5

तिरंगा

तिरंगा

१९९३मध्ये मोठ्या पडद्यावर दाखल झालेल्या 'तिरंगा' चित्रपटाने १२.०२ कोटी रूपयांचा गल्ला जमवला होता.   

3/5

मिस्टर इंडिया

मिस्टर इंडिया

अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी स्टारर 'मिस्टर' चित्रपट १५ ऑगस्ट मध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाही चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली.

4/5

बॉर्डर

बॉर्डर

आजही 'बॉर्डर' चित्रपटाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. जे.पी दत्त यांच्या दिग्दर्शनात साकारण्यात आलेल्या चित्रपटामध्ये अभिनेता सुनील शेट्टी, अक्षय खन्ना आणि जॅकी श्रॉफ या कलाकारांनी मुख्य भूमिका बजावली होती. 

5/5

द लेजेंड ऑफ भगत सिंग

द लेजेंड ऑफ भगत सिंग

२००२ मध्ये मोठ्या पडद्यावर दाखल झालेला 'द लेजेंड ऑफ भगत सिंग' चित्रपटाला प्रेक्षकांना चांगलाच पसंतीस पडला.