Water Bottle Expiry Date : पाण्याच्या बॉटलवर असलेली एक्स्पायरी डेट तुम्ही अनेकदा पाहिली असेल. मात्र ही एक्सपायरी डेट नेमकी कोणत्या गोष्टीची असते प्लास्टिक बॉटलची की पाण्याची? याबद्दल अनेकांना माहिती नसते. तेव्हा याविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊयात.
1/7सध्या जवळपास सर्वच पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की एक्स्पायरी डेट उलटून गेल्यावर त्यातील पाणी हे आपोआप खराब होतं. मात्र तुम्हाला सांगू इच्छितो की बॉटलवर लिहिलेली तारीख ही प्लास्टिक बॉटलची असते तिचा आतल्या पाण्याशी काहीही संबंध नसतो.
2/7पॅकबंद पिण्याच्या पाण्यावर छापलेली तारीख ही त्या पाण्याऐवजी प्लास्टिकच्या बाटलीशी संबंधित असते. जर पाणी शुद्ध राहिले आणि बाटलीचे सील तसेच राहिले तर ते पाणी नैसर्गिकरित्या खराब होत नाही किंवा त्याची मुदत संपत नाही.
3/7प्लास्टिक जुने होत असताना विशेषतः एखाद्या ठिकाणी ते साठवून ठेवले असताना त्याचा उच्च तापमानाचा दीर्घकाळ संपर्क आल्यास प्लास्टिक विघटित होऊ लागते. त्यामुळे BPA आणि अँटीमनी यांसारखी रसायन पाण्यात मिसळू शकतात.
4/7बॉटलमधील पाणी सुरक्षित राहत असले तरी दीर्घकाळ साठवून ठेवल्यास किंवा तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्याने पाण्याला प्लास्टिक सारखी चव किंवा पाण्याला त्याचा वास येऊ शकतो. हा बदल सहसा पाण्यामुळे नाही, तर बाटलीच्या स्थितीमुळे होतो.
5/7जेव्हा प्लास्टिकचा दर्जा खालावतो तेव्हा सूक्ष्मजीव बाटलीत प्रवेश करणं सोपं होतं. पाण्याची नैसर्गिक गुणवत्ता नव्हे तर अशावेळी पॅकेजिंग ही चिंतेची बाब ठरते.
6/7पाण्याच्या बाटलीवर एक्स्पायरी डेट छापण्याची सुरुवात १९८७ मध्ये न्यू जर्सीने केली होती. त्यांनी तसा कायदा लागू केला होता. या कायद्यान्वये बाटलीबंद पाण्यासह खाद्यपदार्थ आणि पेयांच्या उत्पादनांवर कालबाह्यता तारीख दर्शवणं अनिवार्य करण्यात आले होते.
7/7न्यू जर्सीनंतर काही इतर देशांनी सुद्धा अशा प्रकारचे नियम लागू केले आणि त्यानंतर वेगवेगळ्या देशांसाठी वेगेवेगळी पॅकेजिंग करण्याऐवजी सर्वच कंपन्यांनी सरसकट पाण्याच्या बॉटलवर एक्स्पायरी डेट लिहिण्यास सुरुवात केली.