Water Cut in Thane: ठाणे शहरातील काही भागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
1/8Water Cut in Thane: ठाणे शहरातील काही भागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
2/8महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणाऱ्या देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
3/8गुरुवार, 7 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते शुक्रवार, 8 मे 2026 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत हा शटडाऊन लागू राहणार आहे.
4/8जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय (HSR) येथे बारवी गुरुत्ववाहिनी क्रमांक १, २ व ३ वर उन्नतीकरण तसेच तातडीच्या देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे.
5/8या कालावधीत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31) मधील काही भाग वगळता), कळवा या प्रभाग समित्यांतील सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
6/8तसेच वागळे प्रभाग समितीतील रुपादेवी पाडा, किसननगर क्र. 2, नेहरूनगर आणि मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव या भागांचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे.
7/8पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे.
8/8त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवावे व पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.