'बुलबुल'चा कहर; ७ जणांचा मृत्यू, शेकडो झाडं जमिनदोस्त

Nov 11, 2019, 10:10 AM IST
1/6

बुलबुल चक्रीवादळाने (Cyclone Bulbul)पश्चिम बंगालच्या तीन जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळाने आतापर्यंत ७ लोकांचा मृत्यू झाला असून, जवळपास २ लाख ७३ हजार लोक या वादळाच्या तडाख्यात सापडले आहेत. चक्रीवादळामुळे दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील हातानिया दौनिया नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडली आहे. (फोटो सौजन्य : एएनआय)

2/6

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेपाच वाजता दक्षिण-पूर्व बांगलादेश आणि लगतच्या दक्षिण त्रिपुरामध्ये तीव्र वादळाची तीव्र स्थिती दिसून आली. येत्या ६ तासांत चक्रीवादळ बुलबुल शमण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य : एएनआय)

3/6

शनिवारी रात्री ८.३० ते ११.३० या दरम्यान आलेल्या तुफान बुलबुल वादळाने सुंदरबन क्षेत्रातील, बंगालच्या किनारपट्टीवर चांगलाच हाहाकार माजवला. (फोटो सौजन्य : एएनआय)

4/6

आपत्ती व्यवस्थापन मंत्री जावेद खान यांनी, या वादळाच्या तडाख्यात २ लाख ७३ हजार लोक प्रभावित झाले असल्याचं त्यांनी सांगितलं. १ लाख ७८ हजार लोकांनी ४७१ मदत शिबिरात आश्रय घेतला आहे. राज्य सरकार बेघर झालेल्या कुटुंबांसाठी ३७३ सामुदायिक स्वयंपाकघर चालवत असल्याची माहिती त्यांनी दिली. (फोटो सौजन्य : एएनआय)

5/6

जावेद खान यांनी २ हजार ४७० घरांचे नुकसान झाल्याची माहिती दिली. त्याशिवाय अन्न व पुरवठा मंत्री ज्योतिप्रिय मल्लिक यांनी, वादळाचा सर्वाधिक फटका बशीरहाट उपविभागातील गावांना बसला असून, या उपविभागात जवळपास ३ हजार १०० घरे उद्धवस्त झाल्याचं त्यांनी सांगितलं. (फोटो सौजन्य : एएनआय)  

6/6

ज्योतिप्रिय मल्लिक यांनी, वादळामुळे शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालं असून या संकटावर मात करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर काम करत असल्याचं ते म्हणाले.  (फोटो सौजन्य : एएनआय)